Vastu Tips For Home : वास्तुशास्त्रानुसार अनेकजण घरातील अनेक कामे चुकीच्या पद्धतीने करत असतात. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतात. तसेच घरातील काही चुकीची कामे तुम्हाला कंगाल देखील बनवू शकतात.
घरातील काही वस्तू चुकीच्या दिशेला ठेवणे तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी समस्यांचे बनू शकते. त्यामुळे वास्तुशास्त्रात कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावी हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यानुसारच घरातील वस्तू ठेवणे आवश्यक आहे.
तुम्हीही तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्या असतील तर आजच त्या योग्य दिशेला ठेवा. तसेच घरातील डस्टबिन चुकीच्या दिशेला ठेवणे तुमच्यासाठी आर्थिक समस्येचे कारण बनू शकते. त्यामुळे घरातील डस्टबिन नेहमी योग्य दिशेला असणे आवश्यक आहे.
कधीही या दिशेला डस्टबिन ठेवू नका
जर तुम्हीही तुमच्या घरातील डस्टबिन चुकीच्या दिशेला ठेवत असाल तर तुमच्यासाठी ते समस्येचे कारण बनू शकते. तुमच्या घरातील डस्टबिन चुकूनही ईशान्य दिशेला ठेऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्हाला आर्थिक अडचण देखील निर्माण होऊ शकते.
या दिशेने डस्टबिन ठेवल्यास आर्थिक समस्या निर्माण होतील
वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला डस्टबिन असणे चुकीचे मानले जाते. तसेच आग्नेय दिशेला डस्टबिन ठेवणे तुम्हाला कंगाल बनवू शकते. तसेच तुमच्याकडे असणारा पैसाही हळूहळू संपुष्टात येईल. कर्जाचा बोजा वाढू शकतो.
डस्टबिन पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवू नका
जर तुम्ही तुमच्या घरातील डस्टबिन पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवली असेल तर ती आजच उचला. कारण या दिशेला डस्टबिन ठेवल्याने तुमच्या नोकरी आणि करिअरच्या संधी तुम्ही गमावू शकता. तसेच घरामध्ये निराशा पसरू शकते.
या दिशेला डस्टबिन ठेवा
तुमच्या घरातील डस्टबिन नेहमी घराच्या नैऋत्य दिशेला किंवा वायव्य दिशेला ठेवणे शुभ मानले वाजते. तसेच डस्टबीनमधील कचरा टाकण्यासाठी दक्षिण-पश्चिम दिशेला टाकावा. यासोबतच डस्टबिन उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवता येईल.
वास्तुशास्त्रात घरामध्ये डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशाही सांगितली आहे. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की डस्टबिन नेहमी घराच्या नैऋत्य दिशेला किंवा वायव्य दिशेला ठेवावा. विसर्जनासाठी दक्षिण-पश्चिम दिशा असल्याने या दिशेला डस्टबिन ठेवणे चांगले. यासोबतच डस्टबिन उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवता येईल.