Toyota Rumion : बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर 7-सीटर कारची विक्री होत आहे. परंतु या कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच जर तुम्हाला स्वस्तात नवीन 7-सीटर कार खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
कारण आता टोयोटा आपली नवीन कार Rumion भारतीय बाजारात लाँच करणार आहे. कंपनीची आगामी कार Ertiga वर आधारित असणार आहे. यात शानदार मायलेज मिळू शकते. जाणून घेऊयात या कारचे फीचर्स आणि किंमत.
कसा आहे कारचा अवतार
कंपनीची आगामी कार मारुती एर्टिगावर आधारित असून त्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात येतील. त्यामुळे या दोन्ही कार एकमेकांपासून वेगळ्या होतील. याच्या बाह्यभागात काही बदल पाहायला मिळतील. कंपनीने काही दिवसांपूर्वी ही कार आफ्रिकन बाजारपेठेत सादर केली होती. नवीन फ्रंट बंपर आणि डायमंड कट अलॉय व्हीलसह इनोव्हा सारखीच ट्रॅपेझॉइडल ग्रिल पाहायला मिळेल.
कंपनीचे हे चौथे बहुउद्देशीय वाहन (MPV) असणार आहे. आत्तापर्यंत कंपनी इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायर सारखी मॉडेल्सची विक्री करत आहे. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत ही MPV सादर केली असून ही नेमप्लेट भारतातही ट्रेडमार्क केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोयोटाची ही सर्वात स्वस्त एमपीव्ही असणार आहे.
जागतिक बाजारपेठेत विकण्यात येणाऱ्या मॉडेलला सर्व काळ्या इंटीरियर्स मिळतील तर इथल्या Ertiga ला बेज रंगाचे इंटीरियर मिळतात. हेच केबिन Rumion मध्ये असू शकतात, या कारमध्ये 1.5-लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन वापरण्यात येईल. जे 103hp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.
कंपनी ही कार सीएनजी प्रकारात देखील सादर करू शकते, कारण टोयोटा आपल्या सीएनजी पोर्टफोलिओचा विस्तार करण्यावर भर देत. सध्या ते फक्त पेट्रोल इंजिनसह बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे आत कंपनी या कारची किंमत काय ठरवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
टोयोटाकडून या कारच्या लाँचिंगबाबत अजूनही कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. परंतु सणासुदीच्या मुहूर्तावर ते बाजारात दाखल होऊ शकते. सुझुकी आणि टोयोटा यांच्या करारानुसार, या दोन्ही कंपन्या वाहन प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान एकमेकांसोबत शेअर करतात. नुकतेच मारुती सुझुकीने इनोव्हा हायक्रॉसवर आधारित मारुती इन्व्हिक्टो ही सर्वात महाग कार म्हणून लॉन्च केली आहे. आता मारुती एर्टिगावर आधारित टोयोटा आपली सर्वात स्वस्त एमपीव्ही रुमिओन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.