EPF Money withdrawal Tips : कामाची बातमी! EPF मधून पैसे काढणे झाले सोपे, अशा प्रकारे सहज काढू शकता पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPF Money withdrawal Tips : खाजगी क्षेत्रातील अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF मध्ये पैसे गुंतवणूक करत असतात. मात्र EPF मध्ये गुंतवणूक केलेले पैसे मिळण्यासाठी काही कालावधी ठरलेला असतो त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकतात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या योजनेमध्ये गुंतवणूक केलेले पैसे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दिले जातात. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्ती आगोदरच यातील पैसे काढायचे असतात मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील पैसे कसे काढायचे हे माहिती नसते.

EPF मधील गुंतवणुकीवर सरकारकडून 8.15 टक्के वार्षिक व्याजदर दिले जात आहे. EPFO च्या नियमानुसार यामधील रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते. मात्र तुम्ही निवृत्तीपूर्वीच यामधील पैसे काढू शकता.

तुम्हाला निवृत्तीपूर्वीच पीएफमधील पैसे काढायचे असतील तर तुम्ही काही आणीबाणीच्या कारणासाठी यामधील पैसे काढू शकता. विशिष्ट हेतूंसाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही पैसे काढू शकता.

बेरोजगारी

जर तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि तुमची नोकरी गेली आणि महिनाभर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही पीएफमधील ७५ टक्के रक्कम काढू शकता. तसेच आणखी दोन महिने बेरोजगार राहिला तर तुम्ही उर्वरित 25 टक्के काढू शकता.

शिक्षण आणि लग्न

तुम्ही पीएफमधील सात वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मुले किंवा विशिष्ट नातेवाईकांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढू शकतात. तुम्हाला उर्वरित रक्कम निवृत्तीनंतर दिली जाईल.

घर खरेदी करणे किंवा बांधणे

EPF च्या नियमानुसार तुम्ही निवृत्तीनंतरच पैसे काढू शकता. मात्र जर तुम्हाला निवृत्तीपूर्वी घर खरेदी करायचे किंवा बांधायचे असेल तुम्ही मासिक पगाराच्या 24 पट आणि बांधकाम किंवा घर खरेदीसाठी 36 पट रक्कम काढू शकता.

गृह कर्जाची परतफेड

पीएफमधील ३ वर्षाच्या गुंतवणुकीनंतर तुम्ही गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी पीएफमधील रक्कम काढू शकता. EPFO सदस्य घर खरेदीसाठी डाउन पेमेंट करण्यासाठी किंवा गृहकर्जाचा EMI भरण्यासाठी जमा झालेल्या निधीच्या 90% पर्यंत काढू शकतो.

वैद्यकीय आणीबाणी

तुम्ही पीएफ गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला वैद्यकीय आणीबाणीसाठी पैसे काढायचे असतील तर तुम्ही पीएफ मधील पैसे सहज काढू शकता. खातेदार त्याच्या हिश्श्याइतकी रक्कम व्याजासह किंवा त्याच्या मासिक पगाराच्या सहापट काढू शकतो.