Ahmednagar Crime : विवाहितेला मारहाण करून विनयभंग ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : एका विवाहितेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात नुकतीच घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहित्ता (दि.२६) एप्रिल रोजी सकाळी आपल्या कुटुंबियांसह एका यात्रेत गेली होती. त्या यात्रेमध्ये तिने सरबतचे दुकान लावले होते.

तेव्हा रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास सदर विवाहितेचा आपल्या पतीसोबत वाद चालू होता. तिच्या पतीने तिला हाताने मारहाण करून तो यात्रेमध्ये निघून गेला. तेव्हा राजू गायकवाड हा त्या ठिकाणी आला. त्याने त्या विवाहितेचा हात धरून विनयभंग केला. यावेळी सदर विवाहितेचा पती घटनास्थळी आला. त्याने विचारणा केली असता गायकवाड याने त्याला मारहाण केली.

या मारहाणी मध्ये त्याच्या नाकामधून रक्त आले आणि तो रस्त्यावर पडला. त्यामुळे राजू गायकवाड तेथून निघून गेला. दरम्यान, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास यात्रेतील तमाशा बंद झाल्यानंतर एक तरुण त्या सरबताच्या दुकानावर आला. राजू गायकवाडच्या पत्नीला तुझ्या सोबत बोलायचे असून तुला गायकवाड यांच्या घरी बोलाविले आहे, असे त्याने सदर विवाहितेला सांगितले.

त्यानंतर सदर विवाहिता आपल्या मुलींसोबत गायकवाड याच्या घरी गेल्या. या ठिकाणी त्यांचे जोरदार भांडण झाले. गायकवाड व त्याच्या परिवारातील सदस्यांनी सदर विवाहितेला मारहाण केली. या घटनेत ती जखमी झाली. याबाबत सदर विवाहितेने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू दत्तू गायकवाड, मालन राजू गायकवाड, सुशिल राजू गायकवाड, दिपाली राजू गायकवाड, मैना राजू गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe