Insurance Policy : मागील काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे अनेकजण स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी विमा पॉलिसी घेत आहेत. या विमा पॉलिसीमुळे खूप मदत होते. तुम्ही काही विमा घेऊ शकता ज्यामुळे तुमचे कुटुंब सुरक्षित राहू शकते. तसेच तुमचे भविष्य सुरक्षित राहते.
परंतु विमा पॉलिसी खरेदी करताना विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला त्या पॉलिसीमध्ये मिळणारे फायदे तसेच नियम आणि अटी माहिती असणे गरजेचे आहेत. नाहीतर तुम्हाला तोटा सहन करावा लागतो.

टर्म इन्शुरन्स
हा एक असा विमा प्लॅन आहे ज्यावर कुटुंबाचा प्रमुख अवलंबून असतो. टर्म इन्शुरन्समध्ये, प्रीमियम प्रामुख्याने मर्यादित कालावधीसाठी भरणे गरजेचे असते. ज्यानंतर त्याला योग्य ते कव्हरेज मिळते.
समजा त्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर या विम्याचे सर्व पैसे त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी मिळतात. या विम्यात जमा करण्यात आलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला देण्यात येते, हे लक्षात घ्या की मुदतीच्या विम्यामध्ये मुदतपूर्ती परतावा दिला जात नाही.
आरोग्य विमा
सध्याच्या काळात आरोग्य विमा खूप गरजेचा आहे. कारण रोगांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा विमा फायद्याचा आहे. समजा तुमच्याकडे चांगला विमा असेल. त्यामुळे मोठे आजार, डॉक्टरांची फी, औषधांचा खर्च यापासून तुमची बचत होते. कारण हा आरोग्य विमा सर्व खर्च कव्हर करतो. परंतु हा विमा घेत असताना तुम्हाला कंपनीच्या सर्व अटी आणि नियमांची माहिती असावी. कारण अनेक आजारांचा त्यात समावेश केला जात नाही.
गृह विमा
तुम्ही तुमच्या घराचा विमा काढणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुमच्या घरात अपघात होतात त्यावेळी हा विमा खूप कामी येतो. त्यामुळे घरात होणारा कोणताही धोका टळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात वैयक्तिक मालमत्तेचाही समावेश होतो. समजा घराला आग लागली किंवा चोरी झाली किंवा अनेक नैसर्गिक आपत्ती आली तर हा विमा खूप उपयुक्त ठरतो.
अपघात विमा
अपघात कधीही कुठेही होतो. त्यामुळे तुमच्याकडे अपघात विमा असावा. तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी अपघात विमा काढावा. पीएम सुरक्षा विमा योजना केंद्र सरकार राबवत असून या योजनेत तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचे कव्हरेज दिले जाते.













