Loan : ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का! कर्जाच्या व्याजात झाली बंपर वाढ, वाचा संपूर्ण माहिती

Published on -

Loan : बँक खाते खूप गरजेचे आहे. याचा वापर शाळा, महाविद्यालये तसेच इतर आर्थिक कामात देखील होतो. बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा घेऊन येत असते. ज्याचा फायदा बँकेच्या ग्राहकांना खूप होतो.

हे लक्षात घ्या की प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असते. तसेच त्यांच्या सुविधा देखील वेगळ्या असतात. परंतु काही बँकांच्या ग्राहकांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनी त्यांच्या कर्जाच्या व्याजात बंपर वाढ केली आहे.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या महिन्याभराच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आता या ग्राहकांना येथून पुढे जास्त व्याज घेऊन कर्ज मिळेल. महागाईच्या काळात त्यांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. कोणत्या आहेत या बँका? तसेच किती व्याजदर आकारण्यात येत आहे? जाणून घेऊयात सविस्तर.

कोणत्या बँकेने वाढवले व्याज? जाणून घ्या

ICICI या बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने सर्व MLCR 5 bps ने वाढवले ​​आहेत. एक महिन्याचा बँकेकडून एसएलसीआर दर 8.35 टक्क्यांवरून 8.40 टक्के केला आहे. त्यामुळे आता ICICI बँकेचा 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा MLCR अनुक्रमे 8.45 टक्के आणि 8.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. इतकेच नाही तर आता बँकेचा एक वर्षाचा एमएलसीआर 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के इतका केला आहे.

बँक ऑफ इंडियाने देखील त्यांच्या एमएलसीआर मध्ये सुधारणा केली आहे तसेच त्यांनी दर वाढवले ​​आहेत. या बँकेचा MLCR 7.95 टक्के, 1 महिन्यासाठी 8.15 टक्के इतका आहे. तसेच 3 महिने, 6 महिन्यांसाठी MLCR दर 8.30 टक्के आणि 8.50 टक्के आहे. त्याच वेळी, बँकेकडून एमएलसीआर 1 वर्षासाठी 8.70 टक्के आणि 3 वर्षांसाठी 8.90 टक्के निश्चित केला आहे.

तर PNB बँकेबद्दल बोलायचे झाले या बँकेचा MLCR 8.10 टक्के इतका आहे. 1 महिन्याच्या वेळी 8.20 टक्के तर 3 महिने, 6 महिन्यांसाठी MLCR 8.30 टक्के आणि 8.50 टक्के आहे. 1 वर्षासाठी MLCR आता 8.60 टक्के आणि 3 वर्षांसाठी 8.90 टक्के निश्चित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News