Agriculture Tips: अल्पभूधारक शेतकऱ्यांची पिके होणार ताबडतोब तणमुक्त! या यंत्रामुळे वाचेल वेळ आणि पैसा

Ajay Patil
Published:
sanedo machine

 Agriculture Tips:  पिकांच्या भरघोस उत्पादन करिता शेतकरी बंधू अनेक प्रकारचे व्यवस्थापन करतात. या व्यवस्थापनाच्या सगळ्या पद्धतींमध्ये आंतरमशागत खूप महत्त्वाचे असते. आंतरमशागतीमध्ये पिकांची कोळपणी आणि निंदणी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यातील तणांचा बंदोबस्त करण्याकरिता निंदनी खूप महत्त्वाचे असते. पिकांमध्ये जर विविध प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा विपरीत परिणाम हा पिकांच्या वाढीवर होतो आणि साहजिकच त्याचा परिणाम हा उत्पादन घटीवर दिसून येतो.

पिके तणमुक्त ठेवण्यासाठी निंदनी करणे गरजेचे असते व याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. सध्या मजुरांची टंचाई आणि मजुरीचे दर पाहिले तर  कुठल्याही शेतकऱ्याला परवडण्याजोगे नाही. या पार्श्वभूमीवर जर आपण तणाचा विचार केला तर अनेक प्रकारचे कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आल्यामुळे आता तणांचा समूळ नायनाट करणे शक्य झाले आहे.

अमेरिकेचा विचार केला तर या ठिकाणी लेझर बेस विड कंट्रोल मशीन वापरले जात आहेत. या यंत्रांच्या वापराकरिता जमीन ही सलग असणे गरजेचे असते.परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीचे तुकडीकरण झाले असल्यामुळे अशा प्रकारची यंत्र वापरण्याला मर्यादा येतात. पार्श्वभूमीवर आता अगदी छोट्या शेतकऱ्यांना देखील शेतामध्ये तणमुक्ती करिता वापरता येईल असे यंत्र विकसित करण्यात आले आहे.

 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सनेडो यंत्र विकसित

शेतातील वाढत्या तणांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील शेतामध्ये यंत्राचा वापर करता यावा म्हणून सनेडो यंत्र विकसित करण्यात आले असून खूप फायद्याचे असे यंत्र आहे. साधारणपणे या यंत्राचा आकार पाहिला तर तो ट्रॅक्टर आणि रिक्षा यांच्यासारखा असून या यंत्राला तीन आणि चार चाके देण्यात आलेले आहेत.

पिकांचे आंतरमशागत करायचे असेल तर सनेडो यंत्राचा वापर खूप सोप्या पद्धतीने करता येतो. या यंत्राचे इंजिन क्षमता 10 एचपी चे असून  एक तासाला आठशे मिली डिझेल या यंत्राला लागते. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना या यंत्राच्या साहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येऊ शकतो. सध्या विविध कंपन्या भारतामध्ये हे यंत्र तयार करत असून ते वेगवेगळ्या क्षमतेमध्ये बनवले जात आहे.

 किती आहे सनेडो यंत्राची किंमत?

या यंत्राची किंमत एक लाख 25 हजार रुपये असून ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील परवडू शकते अशी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe