Panjabrao Dakh Maharashtra Farmer News : गेल्या सात ते आठ दिवसापासून पावसाने ओढ दिली आहे. शिवाय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात धो-धो बरसणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात खंड पाडणार म्हणून पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
अशातच मात्र पंजाबरावांनी एक मोठं भाकित वर्तवल आहे. पंजाबरावांनी 5 ऑगस्ट पासून ते 14 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार मात्र यानंतर राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात 15 ऑगस्ट नंतर बहुतांशी भागात पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच राज्यात 18 आणि 19 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार असं त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. दरम्यान पंजाबरावांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती देखील दिली आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, ते आधी 14 इंचावर सोयाबीन पेरणी करायचे. मात्र सोयाबीन दाट होत असल्याने या अंतरावर त्यांना चांगले उत्पादन मिळत नव्हते. मग त्यांनी 18 इंचावर सोयाबीन पेरणी सुरू केली आणि तब्बल 21 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे त्यांना उत्पादन मिळाले.
दरम्यान यावर्षी त्यांनी 24 इंचावर सोयाबीन पेरला आहे. म्हणजे 2 फुटावर सोयाबीनची पेरणी त्यांनी केली आहे. तसेच पंजाब रावांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणाची निवड करण्याचा सल्ला दिला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 612 आणि 71 या जाती चांगल्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आंबा आणि राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली दुर्वा ही देखील जात चांगली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन काळी कसदार असेल त्यांनी फुले किमया हा राहुरी विद्यापीठाचा वाण वापरावा असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.पंजाबरावांनी गेल्या वर्षी सोयाबीन पीक पेरणी करताना दहा किलो गंधक प्रति एकर वापरले होते.
तसेच त्यांनी सोयाबीन पीक वीस दिवसाचे झाल्यानंतर सुपर फॉस्फेट आणि चाळीस दिवसाचे झाल्यानंतर 12 32 16 ही खते दिलीत. यासोबतच सोयाबीन पिकात तण नियंत्रण देखील अति महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या पिकातून जर चांगले कमी करायचे असेल तर तणाचे वेळीच नियंत्रण करणे जरुरीचे असल्याचे त्यांनी सांगितले.