MLA Rohit Pawar : ‘सीना’ वरील सहा बंधाऱ्यांना सरकारची मंजुरी ! आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

MLA Rohit Pawar : ‘कर्जत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवर ६ बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे.

कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून सीना नदीवरील १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे. तसेच उर्वरित ४ बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकू, दिघी व चौंडी यांचेदेखील गेट दुरुस्तीची कामे प्रस्तावित असून, त्यालादेखील लवकरच मंजुरी मिळेल.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. पवार त्यांनी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन सर्व्हेसाठीपरवानगी मिळवली होती. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर आता १० पैकी ६ बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आ. पवार यांनी उर्वरित ४ बंधाऱ्यांनाही मंजुरी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून पाणी गळती थांबवता येईल.

सीना लाभक्षेत्रात असलेले रातंजण, घुमरी, नागलवाडी, नागापूर, सीतपूर, तरडगाव, या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांचे रुपांतर लातूर टाईप बॅरेजमध्ये होणार असून, याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

मार्च-एप्रिलच्या दरम्यान कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने बंधाऱ्यांमध्ये पाणी राहत नव्हते व ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असे. परंतु, आता लातूर टाईप बॅरेज बंधारे होत असल्याने याचा २८८० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे.

आ. पवार यांनी विधानसभेतदेखील यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. जुन्या पद्धतीचे कोल्हापूर टाईप बॅरेज बंधाऱ्यांनी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लातूर टाईप बंधारे बांधण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या त्यास सरकारने मंजुरी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात लातूर टाईप बॅरेज करावेत, असे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण बंधाऱ्यांच्या सर्व्हेसाठी परवानगी मिळवली होती. तो सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर ते बंधारे व्हावेत, यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता.

तसेच अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर दहापैकी सहा बंधाऱ्यांना परवानगी मिळाली आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांनाही परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा करत आहे. आ. रोहित पवार, (कर्जत-जामखेड विधानसभा)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe