Farmer News : पाटबंधारे विभागाकडून होणारी पठाणी वसुली थांबवा

Ahmednagarlive24 office
Published:

किमान ५० टक्के रक्कम भरा नाही तर शेतीच्या सिंचनासाठी ७ नंबर फॉर्म भरला जाणार नाही. या जाचक अटी व येथील शेतकरी वर्गाकडून पाटबंधारे विभागाकडून होणारी पठाणी वसुली थांबवून, मुदतीच्या आत पाटपाणी स्वीकारण्याचे अर्ज शेतकरी वर्गाचे भरून घ्यावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चितळी टेलच्या वाकडी पुणतांबा, गोंडेगाव, रामपूरवाडी जळगाव भागातील शेतकऱ्यांनी चितळी येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले आहे. गोदावरी उजवा तट कालव्यांतर्गत येणाऱ्या चितळी पाटबंधारे शाखेत सिंचनासाठी ७ नंबर फॉर्म १५ ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत दिली;

परंतु त्यासाठी थकबाकीदार असलेल्या शेतकरी वर्गावर ७० टक्के रक्कम भरली, तरच ७ नंबर फॉर्म भरला जाईल, अशी जाचक अट घातल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.

यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख आबासाहेब नळे यांनी शेतकरी वर्गावर हा अन्याय होत आहे. लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा सोयाबीन, मका, ऊस, कापूस व चारा पिके पाण्यावाचून वाया जाणार. गोदावरी डाव्या कालव्यांतर्गत शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळावे, याकरिता शिवसेनेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांचेही सात नंबरचे फॉर्म भरून घेण्यात यावे.

यावेळी स्वप्नील वाघ, रवींद्र चौधरी, बाबासाहेब मंडलिक, नानासाहेब चौधरी, विजय चौधरी, दादा उफाडे, रामभाऊ जाधव, शंकरराव दळवी, दादासाहेब आंग्रे, संजय धनवटे, बाळासाहेब टूपके, विक्रम जोशी, चांगदेव खेडकर, प्रवीण चौधरी, बाबासाहेब वाघ, दिलीप वाघ आदीसह लाभदारक शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान चितळीसह परिसरात पाऊस लांबणीवर पडल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी वर्गावरील या जाचक अटी शिथील करण्यात येऊन लाभधारक शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळवावे व गावतळे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून मिळावे, यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव वाघ यांनी सांगितले.

अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील असलेली थकबाकी भरल्यानंतर अद्याप त्या भरल्याच्या पावत्या मिळत नसल्याची तक्रार यावेळी करून, ज्येष्ठ नागरिक शंकरराव दळवी हे थकबाकी भरण्यासाठी आलेले असताना,

त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा आम्ही घेत नाही म्हणत त्या न स्वीकारता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावरून सेनेचे आबासाहेब नळे व अधिकारी यांच्यात शाब्दिक झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe