Clove Water Benefits : लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बहुतेक भारतीय घरांमध्ये याचा वापर केला जातो. जेवणातील चव वाढवण्यासोबतच लवंग औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जी आपल्या आरोग्यसाठी देखील खूप फायदेशीर आहे. बहुतेक घरांमध्ये लवंग जेवणात वापरली जाते, पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहामध्ये देखील वापरू शकता. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्याने तुमच्या अनेक शारीरिक समस्या देखील दूर होऊ शकतात.
लवंगात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि ओमेगा-३ फॅटी यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय लवंगात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही भरपूर असतात. अशा स्थितीत लवंगाचे पाणी प्यायल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. चला तर मग आजच्या या लेखात याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिण्याचे फायदे :-
-लवंगाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीमध्ये लगेच आराम मिळतो. तणावामुळे किंवा झोप न झाल्यामुळे तुम्हाला सकाळी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही लवंगाचे पाणी पिऊ शकता. जे लोकं अनेकदा डोकेदुखीने त्रस्त असतात त्यांच्यासाठी हे पाणी खूप फायदेशीर मानले जाते.
-पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लवंगाचे पाणी पिऊ शकता. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. लवंगाचे पाणी प्यायल्याने गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. लवंग छातीत जळजळीपासून देखील आराम देते. जर पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही लवंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता.
-सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिणे देखील खूप फायदेशीर आहे. लवंगाचे पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. हे पाणी प्यायल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील डागांपासूनही सुटका मिळते. लवंगात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.
-मधुमेहाच्या रुग्णांसाठीही लवंगाचे पाणी फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-पावसाळ्याच्या दिवसात आपली रोगप्रतिकाक शक्ती कमकुवत असते, अशात आपण लवकर आजारांना बळी पडतो. म्हणूनच सकाळी लवंगाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. लवंगात मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के आढळतात. दररोज लवंगाचे पाणी प्यायल्याने तुम्ही विषाणूचा संसर्ग टाळाल.