Monsoon Breaking : राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस, तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक भाग वगळता राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कमी दाबाचा पट्टा विरळ झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, आता राज्यात पावसाला अनुकूल वातावरण तयार होत आहे. विदर्भात मान्सून सक्रिय झाला आहे.
शुक्रवारी या भागात ठिकठिकाणी पाऊस पडला, तर राज्याच्या उर्वरित भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडल्या आहेत. कोकण भागातील मुंबईत ०.७ मिमी, अलिबाग २ मिमी, रत्नागिरी १ मिमी व डहाणूमध्ये १ मिमी पाऊस पडला आहे.