वापरा ही ऑनलाइन पद्धत आणि पटकन तपासा तुमच्या मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यातील बॅलन्स

Published on -

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये काही योजना या आर्थिक लाभाच्या योजना असून काही योजना या गुंतवणूक योजना आहेत. या गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा देखील गुंतवणूकदारांना मिळतो व गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित राहते.या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी योजना असून मुलींचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही कन्येच्या नावावर पालकांच्या माध्यमातून हे खाते उघडता येते. या योजनेचा परिपक्व कालावधी 21 वर्षाचा आहे. अशाप्रकारे ही खूप महत्त्वपूर्ण योजना असून याच योजनेविषयी काही महत्त्वाच्या बाबींविषयी अधिकची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 मुलींचे आर्थिक भविष्य सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना असून मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना महत्त्वाची आहे. दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही मुलीच्या नावावर पालकांना हे खाते उघडता येते. प्रत्यक्ष पाहायला गेले तर 21 वर्षाचा परिपक्व कालावधी असलेली ही योजना आहे.

परंतु या योजनेमध्ये तुम्हाला पंधरा वर्षासाठीच पैसे भरावे लागतात.सध्या या योजनेवर आठ टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्हाला देखील जर तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 250 रुपये तर कमाल दीड लाख रुपयापर्यंत वार्षिक गुंतवणूक करण्याची मुभा आहे.

 अगदी साध्या पद्धतीने उघडू शकतात खाते

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्याकरिता तुम्हाला बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे असून या संकेतस्थळावरून या योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. डाउनलोड केल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून ती व्यवस्थित भरून विचारलेली कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडून तुम्ही हा भरलेला फॉर्म तुमच्या नजीकच्या बँक शाखेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करू शकतात.

तुमचा फॉर्म संबंधित बँकेचे किंवा पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी तपासतात व जोडलेल्या कागदपत्रांचे  ओरिजनल कागदपत्रांशी पडताळणी करून पाहतात व हे सगळी प्रक्रिया विनाअडथळा पार पाडल्यानंतर तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडली जाते.

 सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये तुमच्या मुलीच्या नावाने किती रक्कम जमा झाली आहे ते अशा पद्धतीने पहा

तुमच्या मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. याकरिता तुम्हाला तुमच्या बँकेची नेटबँकिंग ही जी काही सुविधा आहे त्या सुविधेचा वापर करणे गरजेचे आहे. तुमचा युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही या नेटबँकिंगमध्ये लॉगिन करावे व त्यानंतर तुम्हाला जो डॅशबोर्ड दिसतो त्या डॅशबोर्डमध्ये तुमचे ज्या ज्या बँकेत किंवा जे जे खाते आहेत त्यांची यादी तुम्हाला दिसते.

तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यामधील जमा रक्कम तपासायचे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही  क्लिक करून डाव्या बाजूला संबंधित खात्याचे विवरण म्हणजेच अकाउंट स्टेटमेंट पर्यायावर क्लिक केले की तुम्हाला स्क्रीनवर या योजनेतील तुमचा सध्याचा किती बॅलन्स म्हणजे शिल्लक आहे हे तुम्हाला पटकन कळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!