बरेचदा शेतामध्ये जी काही पाईपलाईन टाकलेली असते ती एकदा शेताची पूर्व मशागत करताना नांगरणी किंवा रोटावेटर मारताना फुटते त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी लिक होण्याची समस्या उद्भवते. जर या असलेल्या पाईपचा लीक काढायचा असेल तर बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर जमीन खोदून मोकळा करावा लागतो व लीक काढण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागतात. या लेखामध्ये आपण अशी काही सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही पाईपलाईनचा लिक अगदी पाच मिनिटात काढू शकणार आहात.
वापरा ही पद्धत आणि पाच मिनिटात काढा पाईपलाईनचा लीक
बऱ्याचदा शेतामध्ये पाईपलाईन लिकेज झाल्यानंतर आपण दोन्ही बाजूने पाच पाच फूटापर्यंत पाईपलाईन खोदतो. यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर दमछाक होते आणि वेळ देखील भरपूर लागतो. त्यामुळे आपण जर सोपी ट्रिक चा वापर केला तर थोडीशी जागा उकरून आपण पाईपलाईनचा लिकेज आरामात काढू शकतो.
याकरिता तुम्हाला केसांना लावायचा आहे शाम्पू, तसेच सरकू सॉकेट यांचा वापर करावा लागतो. समजा ही ट्रिकचा वापर करताना तुमचा पाईप ज्या ठिकाणी लिकेज झालेला आहे त्या ठिकाण पासून दोन्ही बाजूंनी म्हणजेच दोन दोन फुट असे चार फूट जागा उकरुन घेणे गरजेचे आहे. या पद्धतीने लिकेज काढताना तुम्ही जे सरकू अर्थात क्विक फिक्स सॉकेट असते तीन इंची सॉकेट घेणे गरजेचे आहे.
कारण दोन इंची पाईपलाईन असेल तर दोन इंचीचे सॉकेट घ्यावे व तीन इंचीची असेल तर तीन इंची सॉकेट घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने लिकेज करताना सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी पाईप लीक झाला आहे अशा ठिकाणी फिक्स सॉकेट ठेवून एक माप घेणे गरजेचे आहे. ते पाईप लीक झाल्याच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर लिकेज झालेला पाईप कापून घ्यावा. नंतर जे काही क्विक फिक्स सॉकेट असते यामध्ये एक छोटा पाईपचा तुकडा टाकून घ्यावा.
परंतु हा पाईपचा तुकडा टाकण्याआधी क्वीक फिक्स सॉकेटच्या एका तोंडाला शाम्पू लावून घेणे गरजेचे आहे. तसेच जो काही आपण पाईपचा तुकडा या सॉकेटमध्ये टाकणार आहेत त्याच्या एका तोंडाला देखील शाम्पू लावून घ्यावा. क्विक फिक्स सॉकेटमध्ये एक रबर असते या रबरावर शाम्पू व्यवस्थित लावून घ्यावा. त्यानंतर या सॉकेटमध्ये व्यवस्थित रित्या पाईपचा तुकडा टाकून घ्यावा. त्यानंतर जो काही सॉकेट मध्ये पाईपचा तुकडा टाकला आहे
त्याचे एका तोंडाला सोल्युशन लावून घ्यावे.त्यानंतर लिक झालेला पाईपला दुसऱ्या ठिकाणी काप देऊन पाईप कापून घ्यावा. त्यानंतर हे फिक्स सॉकेट एका बाजूने पाईप वर व्यवस्थित चढवून घ्यायचा आहे. त्यानंतर सॉकेटच्या एका बाजूला सोल्युशन लावून घ्यावे सोलुशन लावलेली सॉकेटची बाजू ओढून ती लिकेज झालेल्या पाईपच्या एका तोंडात व्यवस्थित टाकून घ्यावी. अशा पद्धतीने फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही लिकेज काढू शकतात. फक्त यामध्ये काळजी अशी घ्यावी की ज्या बाजूने पाण्याचा प्रवाह येणार आहे त्या बाजूला क्विक फिक्स सॉकेटचे मोठे तोंड किंवा मोठी बाजू फिट करावी.
पाच मिनिटात पाईपलाईन चाली केस कसा काढावा हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पहा