Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल खूप माहिती मिळते. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. याच मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
अंकशास्त्रात व्यक्तीच्या जीवनाची गणना मुख्यतः शून्य ते नऊ पर्यंतच्या मूलांक संख्येच्या आधारे केली जाते. जन्मतारखेवर आधारित गणिते एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील शुभ आणि अशुभ परिणामांबद्दल देखील सांगतात. ज्याची माहिती घेऊन ते त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या योजना बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला मूलांक 1 असणाऱ्या लोकांबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो. महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.
-मूलांक 1 असलेले लोक दिसायला अतिशय आकर्षक असतात आणि त्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते. त्यांच्या चेहऱ्यावर लालसरपणा असतो, ज्यामुळे ते शक्तिशाली बनतात. त्यांचा आवाज कर्कश आणि ऐकायला जड असतो.
-हे लोक सर्जनशील स्वभावाचे असतात आणि नेहमी सकारात्मक विचाराने पुढे जातात. प्रत्येक कामाचे नियोजन करूनच ते पुढे सरसावतात आणि समर्पण आणि प्रामाणिकपणाने पूर्ण करतात. म्हणून हे व्यक्ती जीवनात खूप पुढे जातात. तसेच एका चांगल्या पदावर पोहोचतात.
-हे लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात आणि त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल देखील खूप जास्त विचार करतात. पुढे हे लोक अभियंता, डॉक्टर, पायलट, लेखक किंवा सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी अशी पदे भूषवतात.
-मूलांक 1 असलेले लोक मोकळे आणि मोठ्या मनाचे असतात आणि त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे ते लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करतात. त्यांना काहीही करण्याची प्रचंड आवड असते, तसेच या लोकांना खूप शिस्त देखील असते. त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वाने आणि वागणुकीमुळे त्यांना समाजात उच्च स्थान मिळाले.
-हे लोक शिस्तप्रिय स्वभावाचे असतात, त्यामुळे ते दिसायला कडक असले तरी आतून खूप मऊ असतात. या लोकांची लव्ह लाईफ खूप चांगली असते आणि लोक त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. ते त्यांच्या जोडीदारासोबत पूर्ण प्रामाणिकपणे वागतात.