येवले अमृततुल्य सोबत लाखो रुपये कमावण्याची संधी! वाचा कशी घ्यावी या चहाची फ्रॅंचाईजी?

Ajay Patil
Published:
yeole amrittulya tea franchise

जर आपण आज कालच्या व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये सगळ्यात कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेमध्ये आणि भरपूर असा पैसा देणारा व्यवसाय म्हटले म्हणजे चहाचा व्यवसाय होय. तुम्ही अगदी रस्त्याच्या कडेला एखादी छोटीशी हातगाडी लावून या गाडीवर जर तुम्ही चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला तरी तुम्ही खूप चांगला पैसा या माध्यमातून कमवू शकतात. राहिला विषय भांडवलाचा तर तुम्ही कमीत कमी दहा हजार रुपये भांडवलात देखील हा व्यवसाय आरामात सुरू करू शकतात.

त्यामुळे तुम्हाला चांगला इन्कम हवा असेल आणि पैसा देखील कमीत कमी टाकायचा असेल तर तुम्ही चहाचा व्यवसायाची निवड करणे गरजेचे आहे. आता आपण चहाच्या व्यवसायाविषयी विचार केला तर यामध्ये देखील बरेच ब्रँड निर्माण झाले असून त्यातीलच एक महत्त्वाचा ब्रँड म्हणजे येवले अमृततुल्य चहा होय. महाराष्ट्रमध्ये प्रत्येकालाच येवले अमृततुल्य हे नाव चहाच्या बाबतीत माहिती आहे. त्यामुळे या ब्रँड सोबत तुम्ही व्यवसाय उभारून चांगला प्रकारचा व्यवसाय स्थापित करू शकतात. त्यामुळे या लेखात आपण येवले अमृततुल्यचे फ्रॅंचाईजी कशी सुरू करावी व त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याविषयी माहिती घेणार आहोत.

 येवले अमृततुल्य बद्दल महत्त्वाचे माहिती

येवले अमृततुल्य हा चहाच्या क्षेत्रातील ब्रँड सगळ्यांना माहिती आहे. या चहाचा स्टार्टअप असून याचे अनेक आउटलेट महाराष्ट्र मध्ये असून उत्तम प्रतीची चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी हा ब्रँड ओळखला जातो. येवले चहा पुण्याशी निगडित असून पुण्यामध्ये याच्या जवळजवळ 30 शाखा असून महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त आउटलेट उघडण्याचे येवले अमृततुल्य यांचे उद्दिष्ट आहे. साधारणपणे 1983 मध्ये दशरथ येवले व निलेश येवले यांचा प्रामुख्याने दूध विक्रीचा व्यवसाय होता व काहीतरी साईड बिजनेस करावा म्हणून या पिता पुत्राच्या जोडीने चहाचा स्टार्टअप सुरू केला होता.

येवले अमृततुल्य चहाच्या माध्यमातून चहा करिता फिल्टर केलेले पाणी आणि दुधाची गुणवत्ता त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ग्राहकांना उत्तम प्रतीचा चहा पुरवण्यामध्ये यांची खासियत आहे. दहा रुपये प्रती कप चहाची किंमत असून महाराष्ट्रमध्ये येवले चहा खूप प्रसिद्ध आहे. येवले अमृततुल्य दररोज चार हजार कप चहा विकतो आणि बारा लाखाची मासिक कमाई करण्याचे उद्दिष्ट या ब्रँडचे आहे.

 कसे आहे येवला चहा फ्रेंचायसीचे व्यवसाय मॉडेल?

येवले चहा फ्रेंचाईजीचे व्यवसाय मॉडेल हे चार प्रकारात आहे. दहा रुपये प्रति कप या चहाची किंमत असल्यामुळे ती प्रत्येक ग्राहकाला परवडणारी असून चहाची चव आणि गुणवत्ता तसेच स्वच्छता  इत्यादी बाबतीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येवले चहाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. जर आपण येवले चहाचे टार्गेट कस्टमर पाहिले तर ते मध्यम आणि कामगार वर्ग, कार्यालयीन कर्मचारी तसेच मजूर, महाविद्यालयीन आणि संस्थात्मक विद्यार्थी, पर्यटक तसेच किशोर, प्रौढ आणि वृद्ध लोक, कॅन्टीन आणि हायवे इत्यादी यांच्या टार्गेट कस्टमर आहे.

जर आपण येवले चहाचे मार्केटिंग किंवा प्लॅनिंग पाहिली तर पुण्यामध्ये जेव्हा येवले चहाची सुरुवात झाली होती तेव्हा येवले चहाच्या संस्थापकांनी पुण्यात राहणाऱ्या प्रत्येकासाठी हा चहा नियमितपणे वापरावा याकरिता ओरल मार्केटिंग म्हणजेच तोंडी जाहिरात करण्याचे धोरण ठेवलेले होते.

परंतु आता अनेक बिल बोर्ड तसेच प्रिंटेड मीडियामध्ये जाहिराती, गुगलच्या माध्यमातून तसेच पर्यटकांना आकर्षित करता यावे यासाठी स्थानिक डिरेक्टरीमध्ये यादी करणे, सोशल मीडियाचा वापर करून या चहाची चव तसेच प्रक्रिया आणि किंमत हायलाईट करण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. येवले चहाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुधाचा दर्जा आणि गुणवत्ता याच्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ग्राहकांना चहा देणे हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे.

 अमृततुल्य चहा फ्रेंचायजी घेण्यासाठी पात्रता

100 ते २५० स्क्वेअर फुट चौरस फुट जागा येवले चहा फ्रेंचाईसी आउटलेट स्थापन करण्यासाठी आवश्यक असून  तुम्हाला काही कागदपत्रांची देखील आवश्यकता भासते. या कागदपत्रांमध्ये जीएसटी नोंदणी, येवले अमृततुल्य यांच्याकडून एफएसएसएआय मंजुरीची कागदपत्रे तसेच येवले अमृततुल्य कडून ट्रेडमार्क ची मान्यता, भाडेकरार आणि पॅन कार्ड व  आधार कार्ड इत्यादीचा तपशील लागतो.

 पात्रतेचा विचार केला तर

येवले अमृततुल्य फ्रेंचाईसी चे मालक म्हणून पात्र होण्याकरिता तुमच्याकडे शिक्षण तसेच उद्योजकता कौशल्य इत्यादी गोष्टींना आधार देणारी कागदपत्रे असणे गरजेचे असून फ्रेंचाईजी उत्तम रित्या चालवण्याकरिता तुम्ही कर्मचाऱ्यांना विक्रीच्या बाबतीत पुरेसे ट्रेनिंग, चहा बनवण्याचे ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. जेणेकरून या माध्यमातून येवले अमृततुल्य ब्रँडची जी काही प्रतिष्ठा आहे ती ग्राहकांमध्ये टिकून ठेवता येईल.

 किती करावी लागते गुंतवणूक?

यामध्ये नियमित मॉडेल करिता( मेट्रो शहरांमध्ये) एकूण गुंतवणूक ही दहा लाख पन्नास हजार( जीएसटी वगळून ) यामध्ये

 फ्रॅंचाईजी फीतीन लाख अधिक अठरा टक्के जीएसटी

 विपणन शुल्क एक लाख 50 हजार अधिक अठरा टक्के जीएसटी

 पायाभूत सुविधा खर्च पाच ते सहा लाख रुपये( जीएसटी वगळून )

हा खर्च अंदाजे असून त्यामध्ये पायाभूत सुविधा तसेच नूतनीकरण आणि स्थान यानुसार बदल होऊ शकतो. येवले चहाच्या फ्रेंचाईजी मध्ये दरमहा तुम्ही एक लाख रुपये पर्यंतचा नफा देखील कमवू शकता.

 येवले अमृततुल्य चहा फ्रॅंचाईजी करिता अर्ज कसा करावा?

तुम्हाला देखील या चहाची फ्रेंचायसी घ्यायचे असेल तर याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागतो व तो या चहाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन करणे गरजेचे आहे व अर्ज सादर केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती देणे गरजेचे आहे. त्यानंतर येवले अमृततुल्य कडन पुढची प्रोसेस करिता तुम्हाला वाट पाहावी लागते.

 अशा पद्धतीने तुम्ही येवले अमृततुल्य सोबत तुमचा व्यवसाय करून चांगला नफा मिळवू शकतात.

 अधिक माहिती करिता या ठिकाणी साधा संपर्क

 येवले अमृततुल्य वेबसाईट लिंक

yewaleamruttulya.com

संपर्कासाठीचा पत्ता

कार्यालय क्रमांक 101,पहिला मजला, सिल्वर पॉईंट बिल्डिंग, कात्रज-कोंढवा रोड, विश्व जिम जवळ, कात्रज पुणे

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe