Inspirational story:शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी तरी पहिलाच प्रयत्नात कृषी विभागाच्या उपसंचालकपदी गवसणी

Ajay Patil
Published:
inspirational story

Inspirational story:- वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि त्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये अनेक तरुण-तरुणी गुंतले असून मोठ्या प्रमाणावर अभ्यास अशा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केला जातो. मागील काही वर्षांपूर्वीचा जर आपण समाजाचा एकंदरीत विचार करण्याचा दृष्टिकोन पाहिला तर तो असा होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही किंवा त्यांच्या क्षमतेचे हे काम नाही.

कारण बऱ्याच प्रकारचे महागडे क्लासेस तसेच नियमितपणे अभ्यासाचे नियोजन यासाठी खूप महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार केला तर प्रामुख्याने शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी जास्त करून दिसून येते. शेतकरी कुटुंब म्हटले म्हणजे कायम कामाची धावपळ तसेच शेतीत आई-वडिलांना मदत करणे हे क्रमप्राप्त असते. अशातच अशाच परीक्षांचे अभ्यासाचे नियोजन कशा पद्धतीने करावे हा एक मोठा प्रश्न असतो.

परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून एमपीएससी असो की यूपीएससी यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर यश संपादन केल्याचे आपल्याला दिसून येत आहे.यामागे प्रचंड प्रमाणात असलेला अभ्यास आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी असलेली प्रचंड मेहनत महत्त्वाची असतात. या सगळ्या अनुषंगाने जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पूर्ली या गावचे प्रतीक पाटील यांनी अवघ्या 23 व्या वर्षी कृषी विभागाच्या उपसंचालकपदी गवसणी घातली असून त्यांचीच यशोगाथा आपण पाहणार आहोत.

 प्रतीक पाटील ठरले गावातील पहिले क्लासवन अधिकारी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली या गावचे प्रतीक पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये आणि अवघ्या 23 व्या वर्षी कृषी विभागाच्या उपसंचालक पदी गवसणी घातली आणि महत्त्वाचे म्हणजे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पहिलाच प्रयत्नात त्यांनी हे दैदिप्यमान यश मिळवले.

जर त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर प्रतिक यांनी तळसंदे या ठिकाणाच्या डी वाय पाटील कृषी विद्यापीठ या ठिकाणाहून बीएससी ची पदवी प्राप्त केली. त्यांचे वडील हे गावचे माजी सरपंच आहेत. परंतु  राजकारणाच्या मागे न लागता त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय ठरवले व त्या दृष्टिकोनातून सगळे नियोजन केले. विशेष म्हणजे घरची शेती आणि घरचे सगळे काम सांभाळत त्यांनी हे यश मिळाल्यामुळे त्यांचे परिसरामध्ये खूप कौतुक केले जात आहे.

 प्रतीक पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला

याबाबत बोलताना प्रतिक पाटील म्हणाले की, सुरुवातीचे संपूर्ण शिक्षण गावामध्ये झाले व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा द्यायचे निश्चित केले. याकरिता बीएससी ॲग्री साठी त्यांनी प्रवेश घेतला होता. आई वडील हे त्यांचे प्रेरणास्थान होते असे देखील प्रतीक यांनी म्हटले. संपूर्ण राज्यात सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्यामुळे कृषी उपसंचालक म्हणून प्रतीक यांची नियुक्ती झाली आहे.

2022 ला प्रतिकने ग्रॅज्युएशन पूर्ण केले व एक वर्षासाठी पुण्यात तयारी  केली. यामध्ये पूर्व, मुख्य तसेच मुलाखत पार पडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की गावाकडील विद्यार्थ्यांमध्ये खूप पोटेन्शियल असते. फक्त त्यांना योग्य दिशेची गरज असते. यामध्ये बऱ्याचदा अपयश येऊ शकते परंतु खचून न जाता यामधून सावरणे महत्त्वाचे असते व पुढील मार्ग निवडावा हे देखील प्रतीक याने म्हटले.

 वडिलांनी केले प्रतिक यांचे कौतुक

प्रतिकच्या यशाबद्दल त्यांच्या वडिलांनी म्हटले की, प्रतिकला लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती. शेतात जाणे तसेच गुरांसाठी वैरण काढणे आणि म्हशीचे दूध काढणे इत्यादी सर्व काम प्रतिकने केले व हे कामे करत असताना अभ्यास निरंतर चालू ठेवला व हे यश मिळवले. पहिल्या वर्गापासून  कायम प्रथम क्रमांक प्रतीकने मिळवला व कधीही त्याला अभ्यास कर असं म्हणावं लागलं नाही असे देखील त्यांच्या वडिलांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe