NPS : आजच करा ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक! मिळेल 1 कोटींपेक्षा जास्त परतावा; जाणून घ्या योजना

Ahmednagarlive24 office
Published:
NPS

NPS : सध्या गुंतवणुकीसाठी अनेक योजना आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेकजण जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत आपले पैसे गुंतवतात. आपल्या गुंतवणूकदारांना काही योजना सर्वात जास्त परतावा देतात.

त्यापैकी एक योजना म्हणजे NPS. परतावा जास्त मिळत असल्याने अनेकजण NPS मध्ये गुंतवणूक करतात. ही एक सरकारी योजना असून यात निवृत्तीनंतर तुम्हाला 1 कोटींहून अधिक रक्कम मिळेल. त्यामुळे आजच विलंब न करता या योजनेत पैसे गुंतवा.

आता समजा तुमचे वय 30 वर्षे असेल आणि जर तुम्ही तुमच्या NPS खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला ५,००० रुपये जमा करत असाल तर अशा प्रकारे तुमची वार्षिक गुंतवणूक 60 हजार रुपये इतकी होते. यानुसार तुमच्याकडे 30 वर्षात 18 लाख रुपये येईल.

हे लक्षात घ्या की जर तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,13,96,627 रुपये मिळतात. यामध्ये व्याजाची रक्कम 95,96,627 रुपये इतकी असणार आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेवर जास्त व्याजाचा लाभ मिळतो.

NPS मध्‍ये तुम्‍हाला गुंतवणुकीसाठी एकूण दोन प्रकारचे पर्याय मिळतात, यात पहिला पर्याय असा आहे की तुम्हाला अॅन्युइटी प्‍लॅनमध्‍ये सर्व पैसे गुंतवून पेन्शनचा लाभ घेता येतो. तर दुसऱ्या पर्यायांतर्गत, ६० टक्के रक्कम काढता येते. उरलेली ४० टक्के रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवावी लागते. तसेच निवृत्तीनंतरच्या रकमेच्या कमीत कमी ४० टक्के रक्कम अॅन्युइटी प्लॅनमध्ये तुम्हाला गुंतवावी लागते.

समजा जर गुंतवणूकदाराने 1,13,96,627 रुपयांपैकी 40 टक्के म्हणजेच 45,58,650 रुपये वार्षिकीमध्ये गुंतवायचे ठरवले तर गुंतवणूकदारां थोडे कमी पेन्शन मिळेल. अशा परिस्थितीत अंदाजे ७ ते ८ टक्के वार्षिक व्याज गुंतवणूकदारांना मिळेल असे गृहीत धरा. त्यानंतर, तुमची वार्षिक पेन्शन 3,19,105 रुपये ते 3,64,692 रुपये इतकी असणार आहे. म्हणजेच तुमचा महिन्याचा नफा केवळ रुपये 26,592 ते 30,391 रुपये इतका असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe