अरे बापरे, २०५० पर्यंत जगभरातील २५० कोटी लोक होणार बहिरे

Published on -

Health News : जगभरात वेगाने होत असलेले शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांची प्रचंड वाढती संख्या आणि भरीस भर म्हणून स्मार्टफोनमुळे हेडफोन्सच्या वापरात झालेली प्रचंड वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून जगात कोलाहल वाढला आहे. त्याची परिणीती म्हणून लाखो लोकांची श्रवणक्षमता म्हणजे कानांनी ऐकण्याची शक्ती कमी होत चालली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यासंदर्भात दिलेली माहिती धक्कादायक आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, सध्या जगभरात सुमारे १५० कोटी लोकांना बहिरेपणाच्या समस्या आहेत. उत्तरोत्तर ही समस्या वाढत जाणार असून, सन २०५० पर्यंत जगातील सुमारे २५० कोटी लोकांना बहिरेपण येण्याची शक्यता आहे.

फ्रान्समध्ये २५ टक्के लोकांना बहिरेपणाची समस्या

फ्रान्सच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिसीन’ने केलेल्या सर्वेक्षणातून असेच धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या देशात २५ टक्के नागरिक बहिरेपणाच्या म्हणजेच श्रवणक्षमतेशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत.

सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, काही लोकांना रक्तातील साखरेचे प्रमाण (बल्डशुगर) वाढल्याने तसेच डिप्रेशनमुळे ऐकू कमी येण्याची समस्या भेडसावते, तर काही लोकांमध्ये ही समस्या एकाकीपण, शहरातील कोलाहल आणि हेडफोनचा अतिवापर या कारणांमुळे निर्माण झाली आहे.

फ्रान्समध्ये पहिल्यांदाच एवढ्या व्यापक स्तरावर या समस्येवर संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात १८ ते ७५ वर्षे वयोगटातील १ लाख ८६ हजार ४६० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe