Samsung Galaxy Watch : पहिल्यांदाच 23 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल सॅमसंग स्मार्टवॉच, पहा संपूर्ण ऑफर

Published on -

Samsung Galaxy Watch : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही 23 हजार रुपयांनी स्वस्तात Samsung Galaxy Watch खरेदी करू शकता. Flipkart वर एक सेल सुरु आहे यात तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 ची ब्लूटूथ आवृत्ती 9000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सूचीबद्ध करण्यात आले आहे. WearOS आधारित सॉफ्टवेअरमुळे, ग्राहकांना या स्मार्टवॉचमध्ये त्यांच्या आवडीचे अनेक स्मार्टवॉच अॅप्स डाउनलोड आणि वापरता येतील. कंपनीकडून या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर उपलब्ध करून आहे, ज्याद्वारे ग्राहकांना फोनशिवाय वॉचमधून कॉल करता येईल. तसेच बँक ऑफर्ससह, त्यावर अतिरिक्त सवलत तुम्हाला मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 किंमत

किमतीचा विचार केला तर सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 च्या 44mm डायल आकाराच्या ब्लूटूथ मॉडेलची किंमत लाँचवेळी 29,999 रुपये ठेवली होती, परंतु सेल दरम्यान तुम्ही ते फ्लिपकार्टवर 70% सूट मिळाल्यानंतर अवघ्या 8,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

तसेच जर ग्राहकांनी ICICI बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक कार्ड किंवा फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे पैसे भरले तर त्यांना 10% पर्यंत कॅशबॅक मिळेल. बँक ऑफरमुळे या मॉडेलची किंमत 7,109 रुपयांपर्यंत कमी होईल.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये गोल डायल आणि आर्मर्ड अॅल्युमिनियम फ्रेम आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 450×450 पिक्सेल रिझोल्यूशनसह येईल. हे स्मार्टवॉच दोन फिजिकल बटणांशिवाय सिलिकॉन पट्टा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सुलभ नेव्हिगेशनसाठी व्हॉईस कंट्रोल आणि जेश्चर कंट्रोल सारखे पर्यायही या स्मार्टवॉचमध्ये समाविष्ट केले आहेत. Exynos W920 प्रोसेसर असणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये 16GB स्टोरेज आणि सॅमसंग पॉवर्ड WearOS दिले आहे.

इतर आरोग्य फीचर्सबद्दल बोलताना झोपेचे विश्लेषण ते महिलांच्या आरोग्याचे निरीक्षण अशा अनेक वैशिष्ट्यांचा त्यात समावेश केला आहे. सॅमसंग वॉचमध्ये 90 पेक्षा जास्त वर्कआउट मोड देण्यात आले आहेत. तुम्हाला ते थेट वायरलेस बडशी कनेक्ट करता येईल. 50 मीटर खोलीपर्यंत पाणी प्रतिरोधक, स्मार्टवॉच 108 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. यात 40 तासांपर्यंत बॅटरी आयुष्य मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe