Smartphone Offer : स्वस्तात खरेदी करा iPhone 14 Plus आणि Samsung चा 5G फोन, ‘या’ ठिकाणी मिळतेय संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Offer : तुम्हाला आता मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात iPhone 14 Plus आणि Samsung Galaxy S22 Plus 5G स्मार्टफोन खरेदी करता येतील. फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. या अंतर्गत तुम्हाला फोन कमी किमतीत खरेदी करता येतील.

तुम्हाला iPhone 14 Plus वर 41,150 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. परंतु तुम्हाला ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे, कारण ही ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यानंतर तुम्हाला फोन मूळ किमतीत खरेदी करावा लागेल.

आयफोन 14 प्लस ऑफर

किमतीचा विचार केला तर या 128 जीबी आयफोनची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे. परंतु 17% डिस्काउंटनंतर तुम्ही तो 65,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला बँक ऑफरद्वारे या फोनची किंमत आणखी 10% कमी करता येईल.

शिवाय कंपनी या फोनवर 41,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पाहायला मिळेल. हा फोन A15 बायोनिक चिपसेटवर काम करेल. तसेच फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर त्याच वेळी सेल्फीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Samsung Galaxy S22 Plus 5G ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर Samsung Galaxy S22 Plus 5G मध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज पर्याय मिळेल. त्याची मूळ किंमत 1,05,999 रुपये आहे. परंतु सेलमध्ये या फोनची किंमत 88,999 रुपये झाली आहे. बँक ऑफरमध्ये कंपनी फोनवर आणखी 10% सवलत दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत 39,150 रुपयांनी कमी करता येईल. यात शानदार फीचर्स देण्यात आले आहे. यात तुम्हाला 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले पाहायला मिळेल. तसेच या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेट वर काम करतो. यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.