शेतीमाल वाहतूक व्यवसायासाठी 14 किमी प्रति लिटर मायलेज देणारी घ्या ही पिकअप! शेतकऱ्यांना ठरेल फायद्याची, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर प्रामुख्याने ट्रॅक्टर हे वाहन खूप महत्त्वाचे असून शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड केल्यानंतर आंतरमशागतीचे कामे असो याकरता ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

अगदी ट्रॅक्टर प्रमाणेच दुसरे वाहन पाहिले तर शेतकऱ्यांमध्ये पिकअप हे वाहन खूप प्रसिद्ध आहे. भाजीपाला बाजारपेठेपर्यंत तात्काळ पोचवण्यासाठी पिक अप या वाहनाचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

शेतकरी बंधूंनी जर हे वाहन घेतले तर स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देखील देता येते. त्यामुळे जर तुम्हाला देखील एखादा छोटा पिकप वाहन घ्यायचा विचार असेल तर तुम्ही टाटा इंट्रा चा वी 30 हे पिकअप वाहन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

 टाटा इंट्रा वी 30 पिकअपचे वैशिष्ट्ये

हे वाहन शेतकऱ्यांसाठी 1496 सीसी क्षमतेचा उपलब्ध असून त्याला चार सिलेंडर देण्यात आलेले आहेत. कंपनीने या पीकअपला दोन इंजिन दिले असून ते 70 एचपी पावरसह 140 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीने या वाहनाला 80 किमी प्रतितास इतका वेग दिलेला असून 35 लिटर क्षमतेची डिझेल टाकी दिली आहे.

जर आपण या पीकअपचे मायलेज पाहिले तर ते 14 किमी प्रति लिटर इतके आहे. तसेच ही पिकअप एक हजार तीनशे किलो इतके वजन उचलू शकते.तसेच या पिक अप चे वजन 2565 किलोग्राम इतके आहे. तसेच लांबी 4,460mm आणि रुंदी 1930 mm इतकी आहे. तसेच या पिकअपला 175 एमएम इतका ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.

 टाटा इंट्रा वी 30 च्या इतर वैशिष्ट्ये

या पिकअपला इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग देण्यात आली असून कंपनीचा हा पिकअप पाच फॉरवर्ड + एक रिव्हर्स गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. तसेच या पिकअपला सिंगल प्लेट ड्राय फ्रिक्शन डायफ्रेम टाईप क्लच देण्यात आला असून

ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच या पीकअपला पार्किंग ब्रेक सोबत डिस्क आणि ड्रम ब्रेक देखील देण्यात आले आहेत. तसेच या वाहनाची केबिन अतिशय आरामदायी असून ड्रायव्हर सह त्यामध्ये अन्य एकजण आरामात बसू शकतो.

 किती आहे किंमत?

टाटा इंट्रा वी 30 या पिकप ची शोरूम किंमत ही आठ लाख 11 हजार ते आठ लाख 61 हजार रुपये इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे. तसेच राज्य राज्यांमध्ये तिथला आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे किमतीत बदल होऊ शकतो. याशिवाय कंपनीने या पीकअपला दोन वर्ष किंवा 72 हजार तास पूर्ण जे आधी पूर्ण होईल इतक्या क्षमतेत वारंटी प्रदान केलेली आहे.