नाशिकपासून जवळ असलेल्या ‘या’ निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्या आणि एक दिवसाच्या ट्रिपमधून मनाला शांतता मिळवा! वाचा माहिती

Ajay Patil
Published:
saputara

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असून सगळीकडे तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून अनेक ठिकाणी पारा 40° चा पार आहे. त्यामुळे उकाड्याने सगळेजण हैराण झाल्याची स्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बरेच व्यक्ती हे उन्हाच्या सुट्टींचा कालावधीचा सदुपयोग करता यावा आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या या उकाड्यापासून काहीसा आराम मिळावा याकरिता कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रीप प्लान करता.

अशा पद्धतीने ट्रिप प्लॅन करताना एका आठवड्यासाठी किंवा दोन ते तीन दिवसांसाठी देखील केली जाते व कधीकधी वन डे पिकनिकचा प्लॅन देखील बनवला जातो. त्यामुळे एका दिवसात पाहता येतील असे निसर्ग ठिकाणांच्या शोधामध्ये बरेच जण असतात.

महाराष्ट्र मध्ये अशा अनेक पिकनिक स्पॉट आहेत की जे तुम्ही एका दिवसात  फिरून येऊ शकतात व मोठ्या प्रमाणावर पिकनिकचा आनंद देखील मिळवू शकतात. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण अध्यात्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या सभोवती असणाऱ्या काही महत्वाच्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही एका दिवसांमध्ये ही ठिकाणे पाहून येऊ शकतात.

 ही आहेत नाशिक शहरापासून जवळ असलेली पर्यटन स्थळे

1- सापुतारा तसं पाहायला गेले तर सापुतारा हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे. परंतु जरी हे गुजरातमध्ये असले तरी नाशिक शहरापासून अगदी जवळ आहे. सापुताऱ्याला गुजरात मधील एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे हिल स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.

सापुतारा हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खूप महत्त्वाचे असून सुंदरतेत स्वर्गापेक्षा कमी नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कितीही उन्हाची तीव्रता असली तरी या ठिकाणचे तापमान 30° चा आसपास असते. तुम्हाला जर नाशिक वरून सापुतारा जायचे असेल तर हे अंतर 91 किलोमीटर इतके आहे.

2- सिल्वासा आपल्याला माहिती आहे की हे ठिकाण दमण आणि दिवमध्ये असून एक अद्भुत अशा ठिकाण म्हणून ओळखले जाते. सिलवासाला भेट देणे हा एक अनोखा असा  अनुभव असतो. पोर्तुगीज संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सिल्वसाला पाहायला मिळतात.

सिलवासा हे निसर्ग सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे ठिकाण असून तुम्हाला जर दररोजच्या गर्दीपासून दूर शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी उन्हाळाच्या सुट्टीमध्ये सिलवासा हे ठिकाण फायद्याचे ठरेल. नाशिक वरून जर तुम्हाला सिलवासा जायचे असेल तर हे अंतर 127 किलोमीटर आहे.

3- रतनवाडी रतनवाडी हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात असून एक सुंदर गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य मिनिटांमध्ये माणसाच्या मनाला भुरळ घालते. रतनवाडी परिसर हा डोंगराळ परिसर असल्यामुळे या ठिकाणी असलेली हिरवाई पाण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होते.

अगदी कडक उन्हामध्ये देखील या ठिकाणी अल्हाददायक असं वातावरण असतं. रतनवाडी या ठिकाणी तुम्ही रतनगड किल्ला आणि आर्थर लेक सारखे ठिकाणे पाहू शकतात. तसेच या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद देखील घेऊ शकता. तुम्हाला जर रतनवाडीला जायचं असेल तर नाशिक ते रतनवाडी हे अंतर 85 किलोमीटर इतकी आहे.

4- डहाणू जर तुम्हाला नाशिक वरून एका दिवसाची सहलीवर जायचे असेल व समुद्र पाहायचा असेल तर तुम्ही डहाणूला जाऊ शकता. अरबी समुद्राच्या काठावर वसलेले डहाणू हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

हे एक अतिशय शांत आणि नयनरम्य ठिकाण असून या ठिकाणी तुम्ही डहाणू बीच, महालक्ष्मी मंदिर, बोर्डी बीच आणि डहाणूचा किल्ला इत्यादी महत्वाचे ठिकाणे पाहू शकता. तुम्हाला जर सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक रूप पाहायचे असेल तर तुम्ही डहाणू बीचवरून  पाहू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News