Bank FD Vs Post Office Term Deposit : सध्या बँका आपल्या एफडीवर उत्तम व्याजदर ऑफर करत आहेत, त्यासोबतच सरकारने पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमच्या लहान बचत योजनांवरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. अशातच तुम्ही स्वतःसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर आज आम्ही या दोन्ही योजनांची तुलना करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य गुंतवणूक योजना निवडण्यास मदत होईल.
पोस्ट ऑफिस FD वर व्याज दर
पोस्ट ऑफिस एफडीवर जास्तीत जास्त ७.५ टक्के व्याज देत आहे. तथापि, हे व्याज एफडीच्या कालावधीवर अवलंबून असते. सध्या, एका वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 6.9 टक्के, 2 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7.0 टक्के, 3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7 टक्के आणि 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
अल्पबचत योजना नागरिकांना नियमित बचत करण्यास प्रवृत्त करतात. या योजना तीन प्रकारच्या आहेत. यामध्ये बचत योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि मासिक उत्पन्न योजनांचा समावेश आहे.
अल्प बचत योजनेवरील व्याज
बचत खाते ४ टक्के, 1 वर्ष पोस्ट ऑफिस एफडी – 6.9 टक्के, 2 वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी – 7.0 टक्के, ३ वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी – ७ टक्के, 5 वर्ष पोस्ट ऑफिस FD: 7.5 टक्के, 5 वर्षे आरडी: 6.5 टक्के.
बँकांच्या एफडीवर मिळणारे व्याजदर
मोठ्या बँकांमध्ये, HDFC बँक FD वर जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याज देत आहे. एसबीआय एफडीवर वार्षिक ७.५० टक्के व्याज देत आहे. पीएनबी वार्षिक ७.७५ टक्के व्याज देत आहे. आणि ICICI बँक FD वर वार्षिक ७.६० टक्के व्याज देत आहे. सरकार लहान बचत योजनांवर ४ टक्के ते ८.२ टक्के व्याज देत आहे.