PMC Recruitment 2023 : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. पुणे महानगरपालिकेने विविध पदांच्या रिक्त जागावर भरती करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.
पुणे महानगर पालिकेत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांची भरती होणार आहे. या जवळपास 288 जागा आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोणती आहेत पदे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे –
वैद्यकीय अधिकारी : MBBS + MCI/ MMC नोंदणी
स्टाफ नर्स : GNM/ B.Sc नर्सिंग + MNC नोंदणी
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) : विज्ञान विषयात १२ वी पास + पॅरामेडिकल ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स.
अर्ज फी – अर्ज करण्यासाठी काहीही पैसे लागणार नाहीत.
नोकरीचे ठिकाण – पुणे.
अर्ज करण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सर्व्हे नं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे – ४११००५.
या तारखा लक्षात –
अर्ज करण्याची सुरवात – १८ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईट –https://www.pmc.gov.in/mr?main=marathi