Earthquake Update: नोव्हेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रसह भारतात भूकंपाची शक्यता? वाचा या हवामान शास्त्रज्ञाचा दावा

Published on -

Earthquake Update:- भारतात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी भूकंपाचे अनेक छोटे मोठे धक्के जाणवत आहेत. दिल्ली शहराला तर बऱ्याचदा हलक्या स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नेमका या घटनांमध्ये अशी वाढ होण्यामागे देखील काही कारणे असतील हे मात्र नक्की.

याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरण कुमार जोहरे यांनी  15 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र तसेच भारतातील विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसतील अशा पद्धतीचा दावा केलेला आहे. नेमका हा दावा प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांनी कशाच्या आधारावर केलेला आहे याबद्दलची माहिती आपण घेऊ.

 महाराष्ट्रसह भारतातील काही भागात 15 नोव्हेंबरपर्यंत भूकंप

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, भूगर्भामध्ये असणाऱ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने हवामानामध्ये बदल घडून येत असून 15 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र तसेच भारतातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारचे प्राथमिक संशोधन निष्कर्षांच्या माध्यमातून सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणे दाखवीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.

एवढेच नाही तर महाराष्ट्र सह उत्तर भारतामध्ये भूकंप ढग अर्थात इक्यू क्लाऊड व त्यासोबतच धुक्याची निर्मिती होत असल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मुंबई, कोकण किनारपट्टी तसेच कोयना धरण क्षेत्रासह गुजरातसीमा तसेच कच्छ, तसेच हिमालय पर्वतीय पायथ्याशी असलेल्या पट्ट्यात दिल्ली, उत्तराखंड तसेच लेह-लड्डाख, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील सात राज्ये तसेच अफगाणिस्तान,नेपाळ व भूतान, पाकिस्तान तसेच उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या सगळ्या तुलनेत जर दक्षिण भारताचा विचार केला तर त्या ठिकाणी जवळपास भूकंपाचा धोका अत्यंत कमी राहील किंवा राहणार नाही असे निष्कर्ष देखील प्राध्यापक जोहरे यांनी बनवलेल्या सिक्रेट इलेक्ट्रॉनिक उपकरणावर मिळाले आहेत. तापमानामध्ये होत असलेली चढउतार आणि जमिनीखाली  टेक्टोनिक प्लेट्सच्या गतिशीलतेमुळे बाष्पात बदल व भूकंप ढगांची व धुक्याची निर्मिती होत आहे.

प्रा. किरण कुमार जोहरे यांनी कमीत कमी चार प्रकारच्या भूकंप ढगांचा शोध लावला असून अशा प्रकारच्या ढगांची व धुक्याची निर्मिती सध्या महाराष्ट्रात व उत्तर भारतात होत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत चार ते आठ रिश्टर्स  स्केल भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण दल तसेच आपत्कालीन व्यवस्था यांनी तयार राहणे अपरिहार्य आवश्यकता असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe