Fixed Deposit : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, बँका वेळोवेळी विशेष योजना आणतात, तशाच काही काळानंतर त्या बंद देखील होतात, बँका ग्राहकांना नेहमीच्या योजनांपेक्षा विशेष योजनांवर चांगल्या ऑफर देतात. जिथे गुंतवणूकदारांना विशिष्ट कालावधीसाठी उच्च व्याज दिले जाते.
मात्र, या ऑफर काही ठराविक कालावधीसाठीच असतात. इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकेनेही अशीच विशेष योजना जाहीर केली आहे. मात्र, आता या योजनेची मुदत संपणार आहे. जर तुम्हालाही तुमचे पैसे जास्त व्याजाच्या योजनेत गुंतवायचे असतील तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

इंडियन बँक स्पेशल एफडी
इंडियन बँकेने 400 दिवसांची विशेष एफडी जाहीर केली आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदार 10 हजार रुपयांपेक्षा जास्त परंतु 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकतो. या एफडीमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 टक्के व्याज दिले जात आहे. ही योजना या महिन्यात संपत आहे.
इंडियन बँक सुपर 300 योजना
यासोबतच इंडियन बँकेने 300 दिवसांची विशेष योजनाही जारी केली आहे. या अंतर्गत गुंतवणूकदार 5000 रुपयांपेक्षा जास्त आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करू शकतो. सर्वसामान्यांना 7.05 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.8 टक्के व्याज मिळेल. ही योजनाही 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.
IDBI बँक विशेष FD
आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव विशेष एफडीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत, बँक 375 दिवस आणि 444 दिवसांच्या दोन विशेष एफडी ऑफर करत आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 375 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 7.1 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळेल. तर 444 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज दिले जात आहे.