Ahmednagar News : करंजी घाटात ट्रकवर कंटेनर आदळल्याने एक जण गंभीर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात उभ्या असलेल्या कंटेनर आदळल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. २६) ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.

बुधवारी (दि. २५) रोजी रात्री माणिकशहा बाबा दर्ग्याजवळील धोकादायक वळणाजवळ एका ट्रकची स्टेरिंग लॉक झाल्यामुळे हा ट्रक वळणाच्या कडेला उभा करण्यात आला होता.

नगरकडून करंजीकडे भरधाव येत असलेल्या कंटेनर चालकाचा करंजी घाटात कंटेनरवरील ताबा सुटल्याने हा कंटेनर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळला. या अपघातात कंटेनरचाचालक जखमी झाला आहे तर कंटेनरसह उभ्या असलेल्या ट्रकचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने ट्रकचा क्लीनर एका झाडाखाली बसल्यामुळे तो या अपघातात बचावला आहे. अपघातामुळे करंजी घाटात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु काही वेळातच महामार्ग पोलीसांनी अपघातस्थळी येऊन अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

माणिक शहा बाबादर्ग्याजवळील धोकादायक वळणाजवळ नेहमीच अपघात होत असून, या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe