प्रत्येक व्यक्ती मग तो स्त्री असो किंवा पुरुष आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला जपत असतो. आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी अनेक उपायही करतो. या लोकांसाठी करीनाच्या काही टिप्स उपयोगी पडतील.
अभिनेत्री करीना कपूर तिच्या त्वचेची काळजी कशी घेते याबाबत तिच्या सौंदर्याचं गुपित तिने सांगितलं आहे.
उत्तम फॅशनसेन्ससाठी करीनाची कायमच चर्चा होत असते. तिने तिच्या सौंदर्याचं गुपित उघड केलं आहे. लॉकडाउनमुळे सारं काही बंद असल्यामुळे ब्युटीपार्लर, ब्युटीसॅलॉन सारं काही बंद आहे,
त्यामुळे या काळात करीनाने त्वचेची काळजी घेण्यासाठी घरात सहज उपलब्ध होतील अशा पदार्थांपासून फेसपॅक वापरण्यास सुरुवात केली आहे.
तिने इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ती घरगुती फेसपॅक वापर असल्याचं सांगितलं आहे. करीनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने चेहऱ्यावर फेसपॅक लावला असून, ‘
उन्हाळ्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टी मेस्सी बन, कफ्तान आणि होममेड मास्क’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
सध्या करीनाची ही पोस्ट चाहत्यांना आवडत असून १६ लाखांपेक्षा अधिक जणांनी ही पोस्ट पाहिली आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.