Soyabean Bhav : सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात

Ahmednagarlive24 office
Published:
Soyabean Bhav

Soyabean Bhav : पारनेर तालुक्यातील सोयाबीन पिकाची काढणी संपली असून, आता मळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण सोयाबीनचे भाव पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सोयाबीनची पेरणी साधारणतः पाऊस सुरु झाल्यावर जून च्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते; परंतू यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी जून व जुलै महिन्यात सोयाबीनची पेरणी केली.

पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने सोयाबीन उगविण्यास घट झाली. खुरपणीनंतर खते टाकून पाण्याची शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून रात्री पाणी दिले. कालांतराने सोयाबीन काढण्यास आल्यानंतर शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होईना.

विदर्भातील मजूर सोयाबीन काढणीसाठी एकरी साडेतीन हजार रुपये मजुरी मागू लागले. मजूर नसल्याने शेतकरी त्यालाही तयार झाले; परंतू नंतर सहा व सात हजार रुपये एकरी मजुरी मागू लागले.

नाईलाजास्तव मजुरी देऊन सोयाबीनची काढणी करण्यात आली. मळणी यंत्रावाले एका गोणीसाठी तीनशे रुपये मागू लागले. एवढे करूनही सोयाबीन घरात आली. सुरुवातीला ४४ रुपये किलो भाव मिळाला.

आता ४७ रुपये किलोप्रमाणे भाव मिळतो आहे. याचदरम्यान गेल्यावर्षी सोयाबीनचा भाव ५० रुपये किलोपेक्षा जास्त होता. आता मात्र कमी भाव आहे. दसरा सण झाला, दिवाळीही तोंडावर आली असताना पैशांची गरज असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विकताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe