शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. अगदी याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारची देखील नमो शेतकरी सन्मान योजना असून या योजनेमध्ये देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार असून तो देखील दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात विभागून देण्यात येणार आहे.
नुकताच नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आला. या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले परंतु अजून देखील असे बरेच शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजाराचा हप्ता अद्याप पर्यंत जमा झालेला नाही.
ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो. त्याच नियमांच्या आधारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळतो. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा जो डेटा आहे तोच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा डेटा नमो शेतकरी महा सन्मान योजने करिता वापरण्यात आला आहे. तुम्हाला जर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर अगोदर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता का मिळाला नाही याचे कारण शोधणे गरजेचे आहे. नेमके हे कारण कसे शोधावे याविषयीची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला का मिळाला नाही याचे कारण अशा पद्धतीने शोधा
1- याकरिता सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गुगल किंवा गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करावे व ब्राउझरच्या सर्च बार मध्ये पीएम किसान सन्मान निधी असे सर्च करावे.
2- सर्च केल्यानंतर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल व या पेजला खाली स्क्रोल करावे. त्या ठिकाणी तुम्हाला नो युवर स्टेटस हा पर्याय शोधावा लागेल व त्या ठिकाणी क्लिक करावे किंवा टच करावे.
3- या ठिकाणी टच केल्यानंतर एक नवीन इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होतो. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहित नसेल तर या ठिकाणी असलेल्या नो युवर रजिस्ट्रेशन नंबर वर टच करावे.
4- नंतर तुम्हाला तुमचे नाव शोधण्यासाठी चे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. त्यातील पहिला म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि दुसरा म्हणजे आधार कार्ड नंबर हे होय.
5- तुम्ही यातील मोबाईल नंबर या पर्यायावर टच करावे व तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर गेट ओटीपी यावर टच करावे.
6- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल व तो आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थित भरावा व गेट डिटेल या बटणावर टच करावे.
7- या ठिकाणी तुम्हाला तुमचा पीएम किसान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसेल. तो क्रमांक कॉपी करून घ्यावा हो परत पीएम किसान निधी ही वेबसाईट ओपन करावी.
8- त्यानंतर नो युवर स्टेटस या बटनावर क्लिक करावे. कॉपी केलेला तो रजिस्ट्रेशन क्रमांक नो युवर स्टेटस या बटणावर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या चौकटीत पेस्ट करावा व त्यानंतर कॅपच्या कोड टाकावा व गेट डिटेल्स या बटणावर टच करा.
9- या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान योजनेविषयी संपूर्ण माहिती दिसते व ओपन झालेले हे पेज थोडे खाली स्क्रोल करावे. त्याखाली तुम्हाला एफटीओ असा एक पर्याय दिसेल. या पर्यायाच्या समोर जर YES अशी हिरवी टिक दिसली तर समजावे तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या नाही. परंतु या ठिकाणी जर NO असेल तर तुम्हाला हप्त्या मिळण्यामध्ये काहीतरी समस्या आहे असे तुम्ही समजावे.
10- त्यानंतर त्याच पेजेला खाली स्क्रोल केल्यानंतर खाली रीजन ऑफ एफटीओ नॉट प्रोसेस या खाली असलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला पीएम किसान निधी योजनेचा हप्ता का मिळाला नाही.
11- या ठिकाणी तुम्हाला ज्या कारणामुळे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्या कारणाची पूर्तता करून घेणे गरजेचे आहे.
तसेच तुम्ही तुमच्या तहसील कार्यालय मध्ये जाऊन देखील या संबंधीची माहिती मिळवू शकतात. कारण त्या ठिकाणी देखील पीएम किसान योजनेचे एक ऑफिस असते व त्या ठिकाणी तुम्ही अधिकची चौकशी करू शकतात.