Maruti Diwali Offer : मारुती सुझुकी आगामी सणासुदीच्या हंगामात आपल्या काही वाहनांवर मोठी सूट देत आहे. या धनतेरसला व दिवाळीत मारुती सुझुकी आपल्या 6 बेस्ट कार वर मोठी सूट देत आहे.
यामध्ये मारुती ऑल्टो के10, एस्प्रेसो, स्विफ्ट, वॅगनआर आणि सेलेरियो या गाड्यांचा समावेश आहे. या वाहनांवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती खाली दिली आहे. चला पाहुयात.
Wagon R
मारुती वॅगनआर ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. कंपनी यावर 56,000 रुपयांची सूट देत आहे. मात्र, या सवलतीबाबत जास्त फारशी माहिती नाही. मारुती वॅगनआरची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख ते 7.42 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. चार व्हेरियंटसह आठ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. गाडीची बूट स्पेस 341 लिटर आहे.
यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 67 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन जे 90 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिनमध्ये पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एमपी 3 गियरबॉक्स चे पर्याय देण्यात आले आहेत.
सीएनजी व्हेरियंटमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 57 बीएचपी पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. याशिवाय वॅगनआरमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि स्टीअरिंग व्हील कंट्रोल देण्यात आले आहेत.
Maruti Swift
मारुती स्विफ्टवर 42,000 रुपयांची सूट दिली जात आहे. स्विफ्टची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख ते 9.02 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. भारतीय बाजारपेठेत नवीन जनरेशन स्विफ्ट लाँच होणार आहे.
सुझुकी स्विफ्ट चार व्हेरियंटमध्ये आणि नऊ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. इंजिन ऑप्शनमध्ये यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 90 बीएचपीपॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी ट्रान्समिशनसोबत येते.
हे इंजिन सीएनजी व्हर्जनमध्ये देण्यात आले असून हे इंजिन 77 बीएचपी पॉवर आणि 98 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरियंट केवळ पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतो. यात 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक एसी कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आदी फीचर्स देण्यात आले आहेत.
Maruti Suzuki Alto K10
मारुती आपल्या सर्वात स्वस्त हॅचबॅक ऑटो k10 वर 57,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट देत आहे. मात्र कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मारुती ऑल्टो के10 ची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. ऑटो k10 ही 4 व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात 1.0 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे,
जे 67 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. यात पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एमटी गियरबॉक्स चा पर्याय देण्यात आला आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये हे इंजिन 57 बीएचपी पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते आणि फक्त पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते.
Celerio
यंदाच्या दिवाळीत मारुती सेलेरियोवर 51,000 रुपयांची सूट दिली जात आहे. मारुती सेलेरियोची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख ते 7.4 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. सेलेरियो चार व्हेरियंट आणि 6 कलर ऑप्शनसह काम करते आणि 313 लीटरची मोठी बूट स्पेस देखील ऑफर करते.
इंजिन पर्यायांमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 67 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एमसी ट्रान्समिशनसह येते. सेलेरियो सीएनजी व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध आहे, हेच इंजिन 57 बीएचपी पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरियंटमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.
S presso
या धनत्रयोदशीला मारुती सुझुकी एस-प्रेसोवर 51,000 रुपयांची सूट दिली जात आहे. मारुती सुझुकी एस-प्रेसोची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख ते 6.12 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. एस्प्रेसो एकूण चार प्रकार आणि सहा कलर पर्यायांसह येते.
यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 68 बीएचपी पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एमटी ट्रान्समिशनसह येते. हे सीएनजी व्हर्जनमध्ये देखील देण्यात आले आहे, तेथे हेच इंजिन 56 बीएचपी पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजीमध्ये केवळ पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे.