Maharashtra News : नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने शहरामध्ये काल बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून पाच हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार
त्यांच्या पथकाने काल बुधवारी दुपारी शहरातील एका विद्यालया जवळील अविनाश नामदेव जगदाळे यांच्या पान स्टॉल मध्ये तसेच बाळासाहेब शिवाजी नेहे यांच्या किराणा स्टोअर्स मध्ये छापा टाकला टाकला.
या ठिकाणी ५ हजार ३७५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही दुकानांच्या मालकासह विजय भागवत नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील पथकाने संगमनेर येथे ही कारवाई केल्यानंतर पथकातील कर्मचारी शहर पोलीस ठाण्यात आले. यावेळी एक गुटखा विक्रेता पोलीस ठाण्याच्या आवारात फिरत होता. गुन्ह्यात आपले नाव असल्याचे समजताच त्याने धूम ठोकली.