Namo Shettale Abhiyan :- कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत. विविध घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना राबवल्या जात असून यामध्ये पिकांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणजेच
सिंचनाच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यासारख्या योजना खूप महत्त्वपूर्ण आहेत. शेतीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शेतीला पाण्याची उपलब्धता असणे खूप गरजेचे आहे.
या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण बऱ्याचदा वेळेवर पाऊस होत नाही किंवा पावसामध्ये मोठा खंड पडतो अशा विपरीत परिस्थितीमध्ये पिकांना पाणी देता यावे याकरिता शेततळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
तसेच शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायासारखे शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांना करता यावेत यामध्ये देखील शेततळे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. याच अनुषंगाने नमो शेततळे अभियान राबवण्यात येत असून याच अभियानाविषयी या लेखात माहिती घेणार आहोत.
नमो शेततळे अभियान नेमके काय आहे?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अकरा सुत्री कार्यक्रम राबवला जात असून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच नमो शेततळे अभियान राबवले जाणार असून या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 73 शेततळे तयार केले जाणार आहेत.
राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या मागेल त्याला शेततळे हा जो काही घटक आहेत त्या अंतर्गत जे शेततळे उभारण्यात येतील त्यांचादेखील या अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता जो निधी उपलब्ध करून देण्यात येईल त्या निधीमधूनच नमो शेततळे अभियान देखील राबविण्यात येणार आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याच मार्गदर्शक सूचना या नमो शेततळे अभियानासाठी कायम राहणार आहेत.
नमो शेततळे अभियाना संदर्भातील जीआर यासंबंधीचा जीआर
1 नोव्हेंबर 2023 रोजी काढण्यात आला असून त्या माध्यमातून राज्यातील 82% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड या प्रमुख अडचणीवर मात करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करून पाण्याची साठवणूक करणे,
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढवणे व शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यात चालना देण्याच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो ११सूत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत नमो शेततळे अभियान राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
काय आहे शासन परिपत्रकामध्ये?
1-मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नमो ११ सूत्रे कार्यक्रमांतर्गत राज्यात नमो शेततळे अभियान राबविण्यात येत आहे व या अंतर्गत राज्यामध्ये 7300 शेततळे उभारण्यात येतील.
2- छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांमध्ये करण्यात येईल.
3- छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधीतून नमो शेततळे अभियान राबविण्यात यावे.
4- सदर अभियानाच्या अंमलबजावणीकरिता छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील परिपत्रकांमुळे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील.
5- सदर अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त( कृषी ) यांनी उचित कार्यवाही करावी. अशा पद्धतीने शासनाने यासंबंधीचे परिपत्रक काढले असून आता शेतकऱ्यांना शेततळे उभारण्यासाठी या अभियानाचा खूप मोठा फायदा होणार आहे.