Ahmednagar News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून गुंजाळवाडी-निमगाव भोजापूर, मालदाड – चिंचोली गुरव, दरेवाडी-कवठे मलकापूर व तिरंगाचौक ते मालदाड या रस्त्यांच्या कामांसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला.
काही ठिकाणी कामे सुरू झाले. त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अशी टीका माजी सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केली.’
जोर्वेकर म्हणाल्या, आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी ३२ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर झाला. भूमिपूजन होऊन कामांना सुरुवातही झाली.
विरोधकांनी केलेले भूमिपूजन म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे त्या म्हणाल्या. खासदार सदाशिव लोखंडे यांनी १० वर्षांत संगमनेर तालुक्यात लक्ष दिले नाही. विकास कामाच्या निधीसाठी पाठपुरावा केला नाही. फक्त तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमुळे भूमिपूजनाचा केविलवाणी प्रयत्न केला.