Lakshmipujan 2023 : दिवाळीचे शुभ पर्व सुरु झाले असून, देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. तर आज लक्ष्मीपूजन असून, यावर्षी लक्ष्मीपूजनाचे दोन मुहूर्त आहेत. दरम्यान, या दिवाळीत संध्याकाळ आणि रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त असतील. जाणून घ्या याबद्दल.
या वर्षी लक्ष्मी पूजनाचे दोन मुहूर्त असून, लक्ष्मीपूजनाची वेळ कोणती असेल ते जाणून घेऊया. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळीचा सण आणि देवी लक्ष्मीची पूजा कार्तिक महिन्यात अमावस्या, प्रदोष काळ या दिवशी केली जाते.
लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
या वर्षी 12 नोव्हेंबरला दिवाळीत लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिली शुभ मुहूर्त संध्याकाळ म्हणजेच प्रदोष काळात असेल तर दुसरी शुभ मुहूर्त निशिथ काळात असेल. दरम्यान, याशिवाय या दिवाळीत आयुष्मान आणि सौभाग्य योगही तयार झाले आहेत. दरम्यान, वैदिक ज्योतिषशास्त्रात सौभाग्य योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या योगात दिवाळीची पूजा करून शुभ कार्य केल्याने नशिबात वाढ होते आणि सुख-समृद्धी मिळते.
दरम्यान, सौभाग्य योग हा 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 04:25 ते 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 03:23 पर्यंत असणार असून, हा अत्यंत शुभ योग मानला जातो. यासोबतच आज आयुष्मान योग ही आहे. दरम्यान, हा योग 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 4.25 वाजेपर्यंत असणार असून, हे दोन्ही योग अत्यंत उत्तम मानले जातात.