Shani Dev : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व दिले जाते. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्याचा इतर 12 राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. अशातच शनी देवाला इतर ग्रहांमध्ये महत्वाचे स्थान आहे. जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर खोलवर दिसून येतो.
शनी देवाला कर्माचे दाता मानले जातात. शनीच्या कृपेने व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. अशातच पुढील वर्षी 18 मार्च रोजी शनि उदित होईल. आणि फेब्रुवारीमध्ये अस्त होईल. शनी देवाच्या या बदलाचा सर्वाधिक फायदा तीन राशींना होणार आहे. या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो, तसेच संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींवर शनीचा आशीर्वाद असेल चला जाणून घेऊया.
![Shani Dev](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/11/ahmednagarlive24-Shani-Dev-1.jpg)
तूळ
शनीच्या या हालचालीमुळे तूळ राशीचे भाग्य वाढेल. या काळात व्यवसायात लाभ होईल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. प्रगतीची शक्यता आहे. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. एकूण पुढील वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जात आहे.
वृषभ
2024 मध्ये या राशीच्या लोकांवर शनिदेव कृपा करतील. या काळात मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील, नात्यात गोडवा येईल. तुम्हाला अचानक पैसे मिळतील. व्यवसायाचा विस्तार होईल. भौतिक सुख-सुविधांचा लाभ मिळेल. जीवनात झालेले हे बदल तुमच्या मनाला शांती देतील.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी हा बदल खूप शुभ राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. नवीन कमला सुरुवात कराल. त्यामुळे मन समाधानी राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.