Health News : वातावरणात बदल झाल्याने सध्ये बऱ्याच ठिकणी व्हायरल फिवरबरोबर सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
सध्या कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी गरम वातावरण, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अस्थिर वातावरणात व्हायरल आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत रुग्णांची संख्या वाढली आहे. बहुतांशी रुग्णांना तापेबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आहेत. अशा रुग्णांनी दवाखान्यांमध्ये गर्दी केलेली आहे.
अशा रुग्णांबरोबरच डेंग्युचेही रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. हे सगळे विषाणुजन्य आजार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्युचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत.
वातावरणातील बदलामुळे लहान मुलांचे अजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. नागरिकांनी निष्काळजीपणा न करता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.