श्रीरामपुरात जनावरांच्या कातडीची तस्करी उघड ! २५ लाख…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News  : श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली परिसरात जनावरांची कातडी गोदामामधून ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांनी कारवाई केली. यात २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये राजू निसार सय्यद (वय ३३ रा. जेऊर, ता.नगर), दानिश जावेद बागवान (वय १८, सुभेदारवस्ती श्रीरामपूर), फारुख सुलेमान कुरेशी (वय ४५, सुभेदारवस्ती) यांचा समावेश आहे.

पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना नवी दिल्ली भागातील धनगरवस्ती येथे गोदामातून जनावरांच्या कातडीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून तातडीने पोलिस पथक तेथे रवाना करण्यात आले.

यावेळी १५ लाख रुपये किमतीचे ३ हजार जनावरांची कातडी, तसेच १० लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच १६ टी ३३९९) मिळून आला.आरोपींवर प्राणी संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.

यात सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, जीवन सुरुडे, समाधान सोळंके, दादाभाई मगरे, शफीक शेख, रघुनाथ कारखेले, राहुल नरवडे, गौतम लगड, ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश गावडे, रमीझराजा अत्तार, धनंजय वाघमारे आदी सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe