Home Care Tips:- प्रत्येकजण आपल्या राहत्या घराची व घराच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्याला प्राधान्य देतात व ते आवश्यक देखील आहे. घरात देखील खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ठेवली जाते. परंतु तरीदेखील घरामध्ये लाल मुंग्या, स्वयंपाक घरामध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आणि प्रामुख्याने म्हणजे भिंतीवर पाली आणि पालींच्या पिल्लांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
यातील आपण पालीचा विचार केला तर नजरचुकीने जर एखाद्या अन्नपदार्थांमध्ये पाल पडली व ते पदार्थ जर खाल्ले गेले तर विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाल ही धोकादायक आहे. बऱ्याचदा आपल्याला घरांच्या भिंतींवर तसेच ट्यूबलाईटच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर पालींचा वावर दिसून येतो.

याकरिता बरेच जण पाली घरामध्ये येऊ नये त्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना करतात. काही केमिकलयुक्त स्प्रे देखील वापरले जातात. परंतु तरी देखील याचा हवा तेवढा फायदा होताना दिसून येत नाही. यामुळेच आपण या लेखात काही साधे आणि सोपे उपाय पाहणार आहोत.ज्यामुळे घरामध्ये पाल तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही किंवा ज्या असतील त्या घरातून दूर पळतील.
हे उपाय करा आणि घरातून पाली दूर पळवा
1- लाल मिरच्यांचा वापर– घरातून पालींचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी किंवा पालींना घरातून पळवण्याकरिता लाल मिरचीचा पर्याय खूप महत्त्वाचा ठरू शकतो. याकरिता तुम्ही लाल मिरची पाण्यात मिसळून त्याची पावडर संपूर्ण घरामध्ये शिंपडून टाकावी. असे केल्यामुळे पाली घरातून दूर पळतात. फक्त हे पाणी शिंपडताना ते डोळ्यांमध्ये जाणार नाही याची तंतोतंत काळजी घ्यावी.
2- नेप्तलिनचा वापर– पालींना पळवण्यासाठी नेपथलीनच्या गोळ्यांचा वापर देखील प्रभावी ठरतो. याकरिता याच्या गोळ्या तुम्हाला घरात ज्या ठिकाणी पाली जास्त प्रमाणात फिरतात त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. पालींना याचा वास अजिबात आवडत नसल्यामुळे या गोळ्या ठेवल्यानंतर पाली दूर पळतात.
3- अंड्याचे टरफले किंवा साल– अंड्याच्या सुकलेल्या साली घरामध्ये ज्या ठिकाणी पाली जास्त प्रमाणात येतात अशा ठिकाणी ठेवले तर या सालीच्या वासामुळे पाली दूर पडण्यास मदत होते. कारण पालींना अंड्याच्या सालीची ऍलर्जी होते.
4- कॉफीचा वापर– कॉफीचा वास पालींना अजिबात आवडत नाही व याकरिता कॉफीमध्ये तंबाखू पावडर मिसळून ज्या ठिकाणी पाल जास्त प्रमाणामध्ये येतात त्या ठिकाणी तुम्ही ती पावडर लावू शकतात. कॉफीच्या वासामुळे पाल दूर जाण्यास मदत होते.
5- लसूण आणि कांद्याचा वापर– जर घरामध्ये दरवाजा व खिडक्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जर लसणाच्या कळ्या लटकवून ठेवल्या किंवा लसूण आणि कांद्याचा रस काढून त्यामध्ये पाणी मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरामध्ये शिंपडले तरी घरात एकही पाल येत नाही.
अशा या पाच साध्या आणि सोप्या उपायांमुळे तुम्ही घरातील पालींचा प्रादुर्भाव दूर करू शकतात.