Investment Tips : भारतात फार पूर्वीपासूनच बचतीला खूप महत्त्व दिले जाते. जास्त कमाई करणाऱ्यापेक्षा जास्त बचत करणाऱ्याला अधिक मान असतो. दरम्यान, अनेक जण आपल्या बचतीचा एक ठराविक भाग गुंतवणूक करतात.
गुंतवणुकीसाठी एलआयसी, पोस्ट ऑफिस किंवा मग बँकेची एफडी हे ठरलेले प्लॅटफॉर्म आहेत. एलआयसी, पोस्ट ऑफिस किंवा FD मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
मात्र इथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अपेक्षित असा परतावा मिळत नाही. यामुळे अलीकडे अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु लागले आहेत. शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणे अनेकांना आवडत नाही. यामुळे मग काही लोक म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवतात. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी थ्रू अर्थातच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रो गुंतवणूक करून अनेकांनी चांगला परतावा मिळवला आहे.
एसआयपी मध्ये दररोज शंभर रुपयांची गुंतवणूक म्हणजेच महिन्याकाठी तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तरीही एक मोठा फंड तयार होऊ शकतो. महिन्याकाठी तीन हजार रुपयाची एसआयपी मध्ये केलेली गुंतवणूक करोडो रुपये कमवून देऊ शकते.
दरम्यान आज आपण एखाद्या व्यक्तीने जर एसआयपी मध्ये दररोज शंभर रुपये प्रमाणे गुंतवणूक केली तर तो कशा तऱ्हेने करोडो रुपयांचा फंड तयार करू शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
100 रुपयांची गुंतवणूक बनवणार करोडपती
जर एखाद्या व्यक्तीने दररोज शंभर रुपये याप्रमाणे 30 वर्षांसाठी एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर अशा व्यक्तीला दहा लाख 80 हजार रुपये एवढी गुंतवणूक करावी लागणार आहे. जर समजा यावर 12% एवढा परतावा पकडला तर अशा व्यक्तीला या एसआयपी मधून एक कोटी पाच लाख 89 हजार 741 रुपय मिळणार आहेत.
अनेकदा तर एस आय पी मधून 20 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न मिळतो. गुंतवणूकदार असा दावा करतात की एस आय पी मधून 20 टक्क्यांपर्यंत सुद्धा रिटर्न सहजतेने मिळू शकतो.
अशा तऱ्हेने जर रोजाना शंभर रुपये प्रमाणे 21 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर एकूण गुंतवणूक सात लाख 56 हजार एवढी होईल आणि 20% रिटर्न प्रमाणे एक कोटी 16 लाख 5 हजार 388 रुपये एवढे पैसे मिळतील. खरेतर म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास कंपाऊंडिंगचा अर्थात चक्रवाढ व्याजेचा फायदा मिळतो, यामुळे गुंतवणूकदारांना एसआयपी मधून चांगला परतावा मिळत आहे.