अहमदनगर ब्रेकिंग : लाच घेणाऱ्या जिल्हापरिषेच्या लिपिकाला अटक

Published on -

Ahmadnagar Breaking : जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागातील कनिष्ठ सहाय्यक असलेले लिपिक संतोष जाधव यास २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी (दि.१) ही कारवाई केली.

आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. या संदर्भात अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रार या २०२१ पासून जांभळी गावच्या सरपंच आहेत.

त्यांनी गावच्या सभामंडपाकरिता आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा नियोजन समितीने प्रशासकिय मान्यताही दिली होती. या कामाची वर्कऑर्डर देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे मागणी करण्यात आली.

मात्र, वर्क ऑर्डर मिळाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक संतोष बाळासाहेब जाधव याने वर्क ऑर्डर काढण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेच्या दीड टक्के म्हणजे २३ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारदार यांच्या पतीकडे जांभळी गावसाठी मंजूर झालेल्या सभामंडपाची वर्क ऑर्डर देण्यासाठी २३ हजारापैकी तडजोडीअंती २२ हजार ५०० रुपये ठरविण्यात आले. ही रक्कम स्वीकारताना जाधव यास रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सापळा अधिकारी राजू आल्हाट, पोहेकॉ. संतोष शिंदे, बाबासाहेब कऱ्हाड, सचिन सुद्रीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News