कत्तलखाने बंद करा ! वारकरी संप्रदाय व हिंदू समाजाचा उद्या तहसीलवर मोर्चा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे खुलेआमपणे सुरू असलेले कत्तलखाने तालुका प्रशासनाने कारवाई करून तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत, कत्तलखान्यातून सोडवण्यात आलेल्या सर्व गाईंच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी

तसेच गोरक्षकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार (दि.४) रोजी पाथर्डी तहसील कार्यालयावर

महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल वारकरी सांप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून, मोर्चामध्ये जिल्ह्यातील अनेक संत महंत वारकरी संप्रदायातील मंडळी सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात तालुका प्रशासनाला देण्ळयात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, पंधरा दिवसांपूर्वीच शिरापूर, करडवाडी येथील गोरक्षक दीपक महाराज काळे या पती-पत्नीसह त्यांच्या दोन कामगारांना काही व्यक्तींनी जबर मारहाण केली होती,

त्यामुळे वारकरी संप्रदायासह गोपालकांकडूनदेखील या घडलेल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तिसगाव येथे खुलेआम कत्तलखाने सुरू आहेत, याकडे पोलीस प्रशासन मात्र पद्धतशीरपणे डोळेझाक करत आहे.

तिसगाव येथील कत्तलखाने कोणाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत, या कत्तलखान्याला कोणाचा वरदहस्त आहे, याचाही शोध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा,

कत्तलखान्यामुळेच अनेक गाईंचा बळी जात असल्याने कत्तलखाने बंद झाले पाहिजेत, अशी मागणी दीपक महाराज काळे यांच्यासह वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe