बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : बसमध्ये चढताना महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याचे मगळसूत्र लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकावर शनिवारी (दि.२) रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.

याबाबत मेघा सुयोगकुमार कोळेकर (वय-३५) रा. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, शनिवार (ता.२) रोजी मुलगा शौनक याच्यासह पाथर्डीहून शेवगाव बसस्थानकावर आले.

त्यानंतर पैठणला जाण्यासाठी सायंकाळी ५ च्या दरम्यान आलेल्या बोरीवली – पैठण (क्रमांक एम.एच.२० बी.एल ३३१०) या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून लंपास केल्याचे लक्षात आले.

ही बाब वाहकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी चालकाला सांगून बस थेट शेवगाव पोलीस ठाण्यात आणली. पोलीसांनी बसमधील सर्व प्रवाशांची झाडाझडती घेतली. मात्र त्यामध्ये दागिने सापडले नाही.

त्यामुळे कोळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. बस पोलीस ठाण्यात आल्यावर तेथे बघ्याची गर्दी झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe