Aadhar Card News: तुमचे आधार कार्ड दुसरे कोणी चुकीच्या मार्गाने वापरत तर नाही ना? अशापद्धतीने पटकन करा चेक

Ajay Patil
Published:
aadhar card information

Aadhar Card News:- आधार कार्ड हे एक सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला कुठल्याही शासकीय कामाकरिता आधार कार्ड अनिवार्य आहे. तसेच बँक खात्यांना आधार कार्ड लिंक असल्यामुळे आधार कार्डसंबंधी अनेक बाबींविषयी आपण सावधान असणे गरजेचे आहे. साधे तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तरीदेखील तुम्हाला सोबत आधार कार्ड ठेवणे गरजेचे आहे.

म्हणजेच व्यक्तीची ओळख म्हणजेच आधार कार्ड असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही इतके महत्त्व या कागदपत्राला आहे. या आधार कार्डवर जो काही नंबर असतो त्या नंबरवर संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळत असते. परंतु या महत्त्वाच्या अशा आधार कार्डचा वापर करून अनेक सायबर चोरटे लाखो कोटी रुपये हडप करत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत.

आधार कार्ड व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवणे हे सुरक्षिततेच्या अनेक बाबींनी महत्त्वाचे आहे. अशा अनेक गुन्हेगारी प्रकरणे घडत असून आधार नंबर एकाचा व कार्ड दुसऱ्याचा वापरून लोक अनेक गुन्हे करताना देखील दिसून येत आहे. अशा या सगळ्या प्रसंगी तुमचे आधार कार्ड नेमके कुठे कुठे वापरण्यात येत आहे

याची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी माहिती कुठे मिळेल? तर काळजी करण्याची गरज नसून आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये काही सोप्या गोष्टी सांगणार आहोत ज्या आधारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे करण्यात येत आहे ते सहजतेने पाहू शकता.

 या स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या आधार कार्ड सुरक्षित ठेवा

1- जेव्हा तुमचा आधार कार्ड हे व्हेरिफाय होतं तेव्हा त्याची एक हिस्टरी तयार होत असते. त्यामुळे तुम्ही ही हिस्ट्री चेक केली तर तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला गेला आहे ते सहजपणे तुम्ही शोधू शकतात. याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी  https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जाणे गरजेचे आहे.

2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार ऑथेंटीकेशन हिस्टरी हा पर्याय असतो व या पर्यायावर तुम्हाला क्लिक करणे गरजेचे आहे. हा पर्याय तुम्हाला या संकेतस्थळावरील माय आधार या विभागांमध्ये दिसतो.

3- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जातो व तेव्हा तुमचा बारा अंकी आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकणे गरजेचे आहे. हा नंबर टाकल्यानंतर सिक्युरिटी कॅपच्या कोड टाकावा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करावे.

4- त्यानंतर तुमचा आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येतो.

5- जेव्हा तुम्ही हा ओटीपी सबमिट करता तेव्हा तुमचे आधार कार्ड केव्हा आणि कोणत्या ठिकाणी वापरले गेले याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते. परंतु यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हे जे काही सगळे रेकॉर्ड असते ते गेल्या सहा महिन्यांसाठीच उपलब्ध असते.

6- दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड अपडेट असणे किंवा ठेवणे देखील गरजेचे आहे. याकरिता तुम्ही आता 14 डिसेंबर पर्यंत आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करू शकणार आहात. त्यामुळे या कालावधीत आधार कार्ड अपडेट करून घेणे देखील गरजेचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीचा वापर करून तुमच्या आधार कार्डचा वापर कोणी करत तर नाही ना? याची माहिती घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe