Ahmednagar News : नगर तालुक्यातील नेप्ती गावातून एक ११ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता झाला आहे. त्या मुलाला अज्ञात व्यक्तीने त्याच्या राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय कुटुंबियांना असून,
याबाबत मुलाच्या वडिलांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना शनिवारी (दि.२) सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी रविवारी (दि. ३) सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी नगर तालुक्यातील नेप्ती गावात राहतात. त्यांचा ११ वर्षीय मुलगा शाळेत शिक्षण घेतो. तो शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान घरी होता. त्याच दरम्यान त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो मिळून न आल्याने फिर्यादी यांनी रविवारी सायंकाळी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.