Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कापूस व्यापारी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांची ३ लाख रुपयांची बॅग भरदिवसा लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
याबाबत लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर फिर्यादीत म्हटले आहे की, टाकळीभान येथे जय संताजी ट्रेडींग कंपनी नावाचे कापूस खरेदी करण्याचे दुकान आहे. आपण दररोज मालुंजा (ता. गंगापूर) ते टाकळीभान येथे स्वःताच्या खाजगी वाहनाने ये-जा करतो. जय संताजी ट्रेडींग कंपनी नावाचे कापूस खरेदी करण्याचे दुकान उघडले.
त्यानंतर एका ग्राहकाने कापसाने भरलेल्या गोण्या विकण्यासाठी दुPकानामध्ये ठेवल्या व बिल घ्यायला थोड्यावेळाने येतो, असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर श्रीरामपूर-नेवासा रोड लगत आपण दुकानाच्या बाहेरील रोड लगत झाडाजवळ एकटाच खुर्चीवर बसलेलो होतो.
तेव्हा डाव्या हाताच्या बाजुला पैसे असलेली काळ्या रंगाची ऑफीस बॅग ठेवलेली होती. त्यामध्ये रोख रक्कम ३ लाख रूपये असलेली त्यामध्ये आधार कार्ड व पॅन कार्ड, आयडीबीआय बँकेचे एटीएम कार्ड, असे असलेली बॅग ही एक अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वयाचा असलेला याने मागुन येवुन बॅग उचलुन घेऊन श्रीरामपूरच्या दिशेने पळत सुटला.
त्यावेळी आपण आरडाओरडा केला. मात्र त्याच्यासोबत आलेल्या इसमांची गाडी चालू असताना ते बॅग घेऊन पळून गेले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र त्रिभुवन, बाबर हे पुढील तपास करीत आहे.