Success Story : सायकलवर विकायचा पुरणपोळी, आज महाराष्ट्रासह इतरही राज्यात पसरलीये करोडोंची कंपनी

Ahmednagarlive24 office
Published:
Success Story

असं म्हटलं जात की ‘कभी कोशिश करनेवालोकी हार नही होती”.. हे अगदी खरं आहे. जे नव्याने स्टार्टअप सुरु करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट तर अत्यंत महत्वाची आहे. आज प्रत्येक जण स्टार्ट अप सुरू करण्याचा विचहर करतो. यातील काही लोक सुरुही करतात. परंतु जे प्रामाणिक प्रयत्न करतात ते आयुष्यात सक्सेस होतात.

अशीच एक सक्सेस स्टोरी आपण येथे पाहणार आहोत की ज्याने सायकलवर पुरणपोळी विकली. आज त्यांनीच करोडो रुपयांचे पुरणपोळी घर उभे केले आहे. त्यांचे नाव आहे KR भास्कर. चला जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा.

अशी झाली जगप्रसिद्ध पुरणपोळी घरची सुरवात

के आर भास्कर हे कर्नाटक राज्यातील रहिवासी असून ते आज करोडो रुपयांच्या पुरणपोळी घर कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म अत्यंत सध्या कुटुंबात झाला. काहीतरी युनिक करायचे या विचारातूनच त्यांनी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्याने बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. तेथे तब्बल 5 वर्षे हॉटेलमध्ये भांडी आणि टेबल साफ करत होते. पण यातून हवं तस उभा राहता येईना. मग त्यांनी सायकलवर पुरणपोळी विकण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयातून पुढे पुरणपोळी घर कंपनी सुरू झाली.

सुरुवातीच्या काळात, के.आर. भास्कर पुरणपोळी या सायकलवर फिरून विकत असत. यातून ते आपला उदरनिर्वाह करत होते. एके दिवशी भास्कर यांची एका कुकिंग शोमध्ये सिलेक्शन झाले. त्यातून ते स्थानिक भागात लोप्रिय झाले. याचा फायदा घेत त्यांनी पुरणपोळीच्या व्यवसायाचे ब्रँडमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली. प्रयत्नांती त्यांनी कर्नाटकात त्यांचे पहिले पुरणपोळी घर चे आऊटलेट सुरू केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

आज आहे करोडो रुपयांचा व्यवसाय

आज पुरणपोळी घर ही कंपनी नावाजली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अनेक आऊटलेट्स या कंपनीचे आहेत. या सर्व आऊटलेट्समधून ते दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतात. ही कंपनी रोज 1000 हून अधिक पुरणपोळीची विक्री करते. सध्या ही कंपनी आपल्या आउटलेटवर पुरणपोळी व्यतिरिक्त 400 हून अधिक वेगवेगळ्या स्नॅक्सची विक्री करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe