सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Published on -

Government Employee News : जुनी पेन्शन योजना हा मुद्दा राज्यासह संपूर्ण देशभरात कायमच चर्चेत राहतो. हा मुद्दा नसून सरकारी नोकरदार मंडळीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या लोकांची ही मोठी मागणी देखील आहे. ही नोकरदार मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे ही मागणी सरकार दरबारी उचलून धरत आहे.

वेळोवेळी या मागणीवर सरकारकडून देखील सरकारची भूमिका स्पष्ट केली जात आहे. आपल्या महाराष्ट्रातही या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी मार्च 2023 मध्ये एक मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी बेमुदत संपाच हत्यार राज्यातील सरकारी नोकरदार मंडळीने उपसल होत. यामुळे सरकारने यावर गांभीर्याने लक्ष घातलं आणि एका तीन सदस्य समितीची स्थापना केली.

या समितीला तीन महिन्यात अहवाल द्यायचा होता मात्र दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर अखेरकार या समितीचा अहवाल गेल्या महिन्यात शासनाकडे जमा झाला आहे. मात्र अजूनही राज्यातील शिंदे सरकारने या समितीचा अहवाल नेमका काय आहे याबाबत अवगत केलेले नाही. अजूनही या अहवालावर शासनाकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणून राज्य कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

14 सप्टेंबर पर्यंत या जुनी पेन्शन योजनेबाबत निर्णय झाला नाही तर बेमुदत संपाचा हत्यार उपसू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे विचाराधीन आहे की नाही ? याबाबतची माहिती केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. केंद्र सरकारने आज अर्थातच 11 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेला माहिती देताना सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सध्या स्थितीला केंद्र शासनाकडे विचाराधीन नाही.

तथापि, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी लागू केलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) शी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक ते बदल करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. वास्तविक याआधी देखील मोदी सरकारने हीच भूमिका बोलून दाखवली आहे. आता पुन्हा एकदा आपल्या आधीच्या भूमिकेला अधोरेखित करण्याचे काम केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe