strey dog: कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी समजला जातो व त्यामुळे शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कुत्रा पाळतात. एकंदरीत घराच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कुत्रे पाळण्याला खूप मोठे प्राधान्य दिले जाते. परंतु या पाळीव कुत्र्यांव्यतिरिक्त भटके कुत्रे देखील मोठ्या प्रमाणावर वावरताना आपल्याला दिसून येतात.
आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा अशी कुत्रे अन्नासाठी घराजवळ येतात किंवा वस्तीच्या जवळपास वावरतात. परंतु बऱ्याचदा भटक्या कुत्र्यांचा चावण्याच्या घटना आपण वारंवार वाचतो किंवा ऐकतो. त्यामुळे अशा कुत्र्यांपासून सावधानता ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे.
घराजवळ ही भटकी कुत्रे येऊ नयेत याकरिता शहरातील बऱ्याच सोसायट्यांमध्ये लाल किंवा निळ्या रंगाचे पाणी बॉटलमध्ये भरून ती बॉटल लटकवून ठेवली जाते. कारण असे म्हटले जाते की या रंगाच्या पाण्याला पाहून कुत्री घाबरतात. परंतु यामागे किती सत्यता आहे याचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
कुत्र्यांना लाल व निळ्या रंगाची भीती वाटते?
याबाबत जर आपण बारी विद्यापीठाचे मार्शल सिनसिंची यांच्या मताचा विचार केला तर ते असे म्हणतात की कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग दिसत नाही. परंतु असं काही नसून या रंगाच्या वस्तू त्यांच्या डोळ्यासमोरून गायब होतात. परंतु त्या वस्तूंच्या मागे काय आहे हे मात्र कुत्र्यांना दिसते.
रंग आंधळेपणा अर्थात कलर ब्लाइंडनेसच्या समस्यामुळे कुत्र्यांना लाल आणि निळा रंग पाहण्यामध्ये त्रास होतो. त्यामुळेच ते लाल किंवा निळ्या रंगाची वस्तू दिसली तर त्या ठिकाणाहून पळ काढतात.तसेच शहरी व ग्रामीण भागातील कुत्र्यांच्या डोळ्यांच्या बाबतीत विचार केला तर इटलीतील बारी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कुत्र्यांचे डोळे तपासण्याची एक नवीन पद्धत विकसित केली आहे.
काही कुत्र्यांना लाल आणि हिरवा रंग ओळखण्यात बरीच अडचण निर्माण होते. याच कारणामुळे भटके कुत्री ही दिवसा कमी परंतु रात्रीच्या वेळेस जास्त वावरताना आपल्याला दिसतात. परंतु शहरी भागामध्ये कायम लोकांची गर्दी असल्याने कुत्र्यांना एका जागी राहणं शक्य होत नाही व त्यामुळेच ते दिवसभर इकडे तिकडे फिरत राहतात.
काय आहे डोळ्यांचा कलर ब्लाइंडनेस हा विकार? डोळ्यामध्ये काय होतो त्यामुळे बदल?
कलर ब्लाइंडनेस म्हणजेच रंगाधळेपणा यामध्ये रंग स्वतंत्रपणे ओळखण्यामध्ये अडचण निर्माण होते. या प्रकारामध्ये काही विशिष्ट रंग ओळखण्यात खूप समस्या निर्माण होते. प्रामुख्याने लाल किंवा हिरवा आणि कधी कधी निळा रंग देखील ओळखण्यामध्ये गोंधळ उडतो.
यामुळे बऱ्याच कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग ओळखण्यामध्ये अडचण येते. जर आपण प्राण्यांच्या डोळ्यांचा विचार केला तर त्यांच्या डोळ्यांच्या रेटीनामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. ज्यांना शंकू पेशी असतात त्यांना उजेडामध्ये सर्व काही दिसते व शलाका पेशी ज्यांना असतात त्यांना मंद प्रकाशामध्ये दिसायला अडचण निर्माण होत नाही.
मानवी डोळ्यांचा विचार केला तर मानवी डोळ्यांमध्ये शंकू पेशींचे प्रमाण जास्त असते व रॉडस कमी प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला अंधारामध्ये दिसायला अडचण निर्माण होते. परंतु कुत्र्यांचा विचार केला तर त्यांच्या डोळ्यांमध्ये शंकू पेशी कमीत कमी प्रमाणामध्ये असतात मात्र रॉड जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना रात्री जास्त दिसते व त्यामुळेच त्यांचा वावर रात्रीच्या वेळी जास्त असतो.